केल्याने देशाटन
भाग१
रविवारची निवांत सकाळ होती.सकाळी सकाळी दिपाचा फोन वाजला. खरंतर आठ वाजून गेले, तरी अंथरुणातून, उठायचा आळस होता. परंतु स्क्रीन वरती मीनाचं नावाच पाहुन, दिपाने फोन उचलला. मीना ,तिची खास मैत्रीण. दीपा ,मीना, नयना, आणि आणि नीता या चौघी जिवश्च कंठश्च मैत्रिणी. एकाच ऑफिस मध्ये काम करणाऱ्या. गेल्या दोन वर्षातील मैत्री.पण वर्षानुवर्षे सोबत आहेत,असे वाटणारी. एकमेकींच्या सुखा दुःखात , त्या साथीदार. एकत्र शॉपिंग ,पिक्चर ,हॉटेलिंग आणि एकमेकींच्या घरी जाणे, सगळं काही छान एन्जॉय करणाऱ्या.
डिसेंबर महिन्यातील , सुरुवातीचे दिवस. टॉकीज मध्ये नुकताच झिम्मा पिक्चर रिलीज झालेला. दीपाला ,मीनाने, “पिक्चरला जायचं का ?”विचारायलाच फोन केला होता. दुपारी एक वाजता ,मल्टीप्लेक्समध्ये शो होता. रविवार असल्यामुळे सुट्टी होतीच .
घरातल्या आवरून सहज जायला जमणार होते. दीपाने,’ हो ‘म्हणताच ,तिने नयना आणि नीताला काॅन्फरन्सवर घेतलं आणि चौघींच्या मिळून मस्त पिक्चर पाहणे, मॉलमध्ये फिरणे ,आणि हॉटेलिंग ,थोडंसं वाटलं तर शॉपिंग असा प्लान ठरला.
सगळ्यांच्यि घरच्यांना यांची मैत्री माहिती होतीच आणि अधून मधून अशा ब्रेकची गरज ,त्यांना आहे हेही मान्य होते. स्वतःच्या मैत्रिणींसोबतच्या, स्पेसची गरज प्रत्येक स्त्रीला असते, हे घरचे समजुन घेणारे होते. त्यामुळे त्यांच्या या प्लॅनला घरच्यांची मान्यता मान्यता होतीच.
चौघीही छान पैकी पिक्चरला गेल्या. अनोळखी असणार्या, सात जणींची धम्माल ट्रिप , आनंदाची लयलूट बघून चौघीही भारावून गेल्या. पिक्चर नंतर नेहमीच्या हॉटेलमध्ये गेल्या. चौघांनीही आपापल्या आवडीप्रमाणे आँर्डर केलं आणि पिक्चर च्या गप्पा रंगल्या.
“खरंच किती छान ना ग !अशाप्रकारे मैत्रिणींखी ट्रीप.” दीपा म्हणाली.
” होना प्रवासात माणूस जुन्याचा नवा होतो. हे वाक्य तर अगदी मनात ठसलं. घरच्यांसोबत जातो आपण कधीकधी ट्रीपला ,पण शेवटी त्या ट्रीपमध्ये आपल्याला सगळ्यांना सांभाळणं आणि अरेंजमेंट याचं टेन्शन राहतच .घरच्या सगळ्यांना सोडून, फक्त आपणचं फिरायला किती छान.” निता मिळाली.
” अगं आपण आत्तापर्यंत असं थोडंसं पिक्चर ,नाटक ,असं पाहायला जातच होतो ना. चला मग आता दोन रात्रीच्या ट्रीपला जाऊया आपण चौघी. ” मीना म्हणाली.
नयना ने तर लगेच गुगल सर्च करायला सुरुवात केली, की दोन दिवस निवांतपणे कुठे जाता येईल ?
कोणी म्हणत होतं ,अलिबाग, तर कोणाला वाटत होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जाऊया ,कोणाचे म्हणणं होतं मध्यप्रदेशात जाऊ .
चौघींची चर्चा होताहोता ,दोसे ,कॉफी सारं खाऊन झालं. पण एकमत काही होईना. मग शेवटी आधी तारखा तर ठरवूया, मग डेस्टिनेशन ,असं म्हणून चौघींनी एकमेकींचा निरोप घेतला. चौघींच्या व्हाट्सअप ग्रुप होताच, त्यामुळे त्या ग्रुप वर चर्चा सुरूच राहणार होती.
ग्रुप वर दोन-तीन दिवस चर्चा चांगलीच रंगली. शेवटी संक्रांती च्या दरम्यान सुट्ट्या घेऊन ,जाऊया, असं ठरलं. आणि आणि मग जायचं कुठे? याच्यावर चर्चा सुरू झाली. नाशिकपासून जवळच असणारे ठिकाण निवडायचे होते. खूप प्रवासही करायला नको आणि मजाही करता आली पाहिजे, काहीतरी छान बघायलाही मिळायला हवं. या सगळ्या अपेक्षा होत्याच. शॉपिंग तर हवंच हवं. शेवटी हो-नाही करता करता एकदाचा,” मांडू, महेश्वर ,ओंकारेश्वर,इंदौर टूर ठरला.
यात प्रेक्षणीय स्थळ ,देवदर्शन ,खाबुगिरी,शाॅपिंग सारं काही एकत्र करता येईल, याविषयी,चौघींच एकमत झालं. दोन रात्री आणि तीन दिवस असं प्लानिंग सुरू झालं. तीनही दिवस घालायचे ड्रेस कोड ठरवले गेले. खाण्यापिण्याचा खाऊ, थोडाबहुत सोबत घेण्यात आला. अर्थातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जायचं, म्हणजे सुरक्षितता महत्त्वाची होती. त्यामुळे चौघींना आरामात बसून प्रवास करता येईल ,कशी ईनोवा बुक झाली.
दीपाच्या ओळखीचाच ड्रायव्हर आणि गाडी होती.
घरच्यांनीही ,तीन दिवस घरातली काही काळजी करू नका ,पूर्ण पणे मज्जा करा ,एन्जॉय करा, म्हणून मनापासून परवानगी दिली .
अखेर 14 जानेवारी चा दिवस उजाडला . 14 15 16 जानेवारी तारखा ठरल्या होत्या .थंडी ,ऊन असं आल्हाददायक वातावरण आणि पुढचे तीन दिवस फक्त आपल्या चौघींच्या राज्य. भरपूर गप्पा, फिरणं, खाणं ,पिणं,निवांत.आनंद,उल्हास,या सर्व भावना मनामध्ये उचंबळून येत होत्या .
आता शेवटी “गणपती बाप्पा मोरया”चा घोष केला.आणि सार्याजणी घातल्या निघाल्या सहलीला.
काय होणार या चौकडीच्या पहिल्याच ट्रीपमध्ये.
पाहुया पुढच्या भागात.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर