©भाग्यश्री मुधोळकर
भाग-७
गुंजनचं लग्न आनंदात पार पडलं ,म्हणून सारे जण निवांत होते. लेकीची पाठवणी झाली ,त्यामुळे आलेला थोडा हळवेपणानही सगळ्यांमध्ये होताच अशावेळी आपल्यावर आलेल्या संकटाची ,आणि कराव्या लागणाऱ्या ऑपरेशनची माहिती, घरच्यांना देणे, गोपीला भाग होतं. आता फार वेळ दवडून चालणार नव्हतं.
गोपी म्हणाली,
” तुम्ही सारे जण आनंदात आहात, पण मला आता एक गोष्ट तुम्हाला सांगणं भाग आहे.”
” काय झालं गोपी ?काही अडचण आहे का? लग्नामध्ये खर्च वगैरे जास्त झाला का ?”
माणिक ने विचारले.
” नाही रे !सारे काही नीट पार पडले. मला जे बोलायचं आहे ,ते वेगळेच आहे .तुम्हाला माहीतच असेल, की सात आठ दिवसापूर्वी ,मला थोडं बरं वाटत नव्हतं, म्हणून मी डॉक्टर कडे गेले होते.”गोपी बोलत होती.
” हो ना ,आताही तुम्ही थकल्या सारख्याच वाटते आहे. पण आम्हाला वाटतंय ,की हे लग्नाच्या दगदगीमुळे असेल.” सरिता म्हणाली.
” नाही. अगं मला सर्व तपासण्या कराव्या लागल्या आणि त्यातअसं कळलं की मला ब्रेस्ट कॅन्सर झालेला आहे. आता उद्या दवाखान्यात ऍडमिट होऊन, ऑपरेशन करावे लागणार आहे .घरात लग्न असल्यामुळे मी कोणाला काळजी वाटु नये, म्हणून सांगितलं नव्हतं पण आता सांगावंच लागलं .चंपा तुझी मुलं मोठी आहेत, त्यांना जाऊ देत आणि तू माझ्या जवळ दहा पंधरा दिवस अजून थांब.
सुनबाई आहे पण तीही आत्ता गरोदर आहे, त्यामुळे तिला जास्त दगदग झेपावणार नाही. थांबशील ना तू चंपा?”
गोपी म्हणाली .
“अगं ताई! अशावेळी तुला मदत नाही करणार, तर कधी करणार? मी थांबते, पण हा केवढा मोठा धक्का आहे, आमच्यासाठी. गेले आठ दिवस, तू एकटीच हे दडपण सहन करत होतीस .”चंपा म्हणाली.
माणिक ,मोहन, गणेश सारेजण अवाक झाले. गोपीने कुठल्या परिस्थितीत, गुंजन च लग्न पार पडलं, याचा अंदाज सगळ्यांना आला.
आता या आलेल्या संकटाला, सामोरं जावंच लागणार, याची जाणीवही झाली. गोपी स्वतच खूप खंबीर होती, आणि सकारात्मक विचार करणारी होती. त्यामुळे या आजारातून ती बाहेर पडणार, याविषयी सर्वांना खात्री होतीच. घरातली आवराआवर विषयी, चंपाला कल्पना देऊन, गणेश मोहन साऱ्यांना नीट सांभाळण्यास, सांगून गोपी दवाखान्यामध्ये अँडमिट झाली.
ऑपरेशन करणारे डॉक्टर चांगलेच होते, तरीही सर्वांच्या मनावर दडपण होतं ,आणि ऑपरेशन नंतरही येणारे केमोथेरपी आणि इतर सारे सोपस्कार, यामुळे सार्या जणांना, हे आजारपण किती कठीण आहे ?हे माहित होतं. तरीही गोपी स्वतः साऱ्या गोष्टींना, खंबीरपणे तोंड देत होती.
बघता बघता चार महिने उलटले आणि गोपीचे केमोथेरपी आणि सर्व उपचार पूर्ण झालले. गोपी आता आजारपणातून सावरली होती.तुळशीचारस,आर्युवेदिक उपचार घेत होती. पुढची तीन-चार वर्षे स्वतःला जपावे लागणार होते.
सुनेची प्रसुती होऊन एक नातु गोपीकडे आला. गोपीच्या आजारपणातील गंभीरता ओळखुन,गीताच्या आईवडिलांनी ही जवाबदारी पार पाडली.
गोपी आता आपल्या रोजच्या कामांना लागलेली होती. गुंजनही लग्न झाल्यावर, आनंदात होतीच, कारण चांगलंच सासर, मिळालेलं होतं. आईचं आजारपण ,हे तिच्यासाठी ही धक्कादायक होतं ,परंतु नवीन असूनही ,
“आईला गरज असेल ,तेव्हा तेव्हा तू माहेरी जा”
अशी सासू-सासर्यांनी बिनदिक्कत परवानगी दिलेली होती .त्यामुळे गुंजनही ,आपल्या आईची , सेवा करतच होती .
आपल्या लेकीला चांगलं, समजूतदार, सासर मिळालं आहे ,हे या परिस्थितीत गोपी जाणवलं होतं, त्यामुळे गोपीला आनंद होता.
रात्रीनंतर पहाट असते, त्याप्रमाणे गोपीवर आलेलं हे संकट सगळ्यांनी ,खंबीरपणे तोंड दिल्यामुळे ,दूर पळाले, आणि ती पुन्हा सक्षमपणे उभी राहिली.
गुंजन हळूहळू संसारात रमली होती. वर्ष-दीड वर्ष सणवार, मौज मजा करण्यात गेले. तिलाही बाळाची चाहूल लागली .नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर, गुंजनने, एका गुटगुटीत बाळाला जन्म दिला
नातवाला बघून गोपीचं दुखणं, तर कुठच्याकुठे पळाले. कधी माहेरी ,कधी सासरी राहात ,गुंजनने, आपल्या बाळाच्या बाळलीला, सगळ्यांना अनुभवायला दिल्या. गौरव आणि गुंजन चा मुलगा सोमेश, बघता,बघता पाच वर्षाचा झाला .
गुंजनला पुन्हा दुसर्या बाळाची चाहूल लागली, दुसरं बाळंतपण सासू-सासरे करणार होते. नऊ महिने भरण्याआधी आठव्या महिन्यातचं प्रसूती झाली आणि गुंजनने दुसऱ्या मुलाला जन्म दिला.
दुसऱ्या मुलाचं नाव सर्वेश ठेवण्यात आले.’ हम दो हमारे दो ‘चा काळ होता, त्यामुळे आता गौरव आणि गुंजनने कुटुंबनियोजन करायचं ठरवलं.
घरच्यांनी पाठिंबा दिलाच. सर्वेश सहा महिन्याचा झाला, गुंजन, गौरव आणि घरच्या सगळ्यांच्याच लक्षात आलं की, हा इतर सामान्य मुलांप्रमाणे नाही .याच्या हालचाली मंद आहेत आणि ह्याची वाढ ,सर्वसामान्य मुलांप्रमाणे नाही. आता काय वाढून ठेवलं होतं गुंजन च्या पुढ्यात?
क्रमशः
©भाग्यश्री मुधोळकर