भाग ५
©भाग्यश्री मुधोळकर
माणिक ला एक मुलगा आणि एक मुलगी झालेले होते.चंपाला दोन मुले आणि एक मुलगी होती. तिकडे गोपीला ही दुसरी मुलगी झाली. तिचे नाव ठेवण्यात आलं तिचं नाव ‘गुंजन’ठेवण्यात आलं .गुंजन आणि गणेश शाळेत जायला लागले. गोपीचा सुखाचा संसार चालू होता. सगळं काही नीट चालू होतं. गंगाबाईला आपण केलेल्या कष्टाचं ,सार्थक झालं असं वाटत होतं. तिन्ही मुलं आपापल्या मार्गाला लागलेले होते. सारं काही नीटनेटकं चालू असताना, कुणाची तरी दृष्ट लागावी, असं घडलं.
गोपीचा नवरा मोहन, ऑफिस मधून येत असताना, गाडीवरुन पडला.त्याचवेळी समोरुन भरधाव वेगाने ,येणार्या ट्रकने मोहनचा एक पाय जायबंदी केला. तो पाय कापावाच लागला.
दुखण्यातून मोहन बाहेर आला .पण गोपी वर आभाळ कोसळलं होतं. अपघातामध्ये मोहनने पाय गमावला होता. अशा अवस्थेमध्ये त्याला नोकरी करणं ,शक्य नसल्यामुळे ,मोहन ची नोकरी गेली.
सगुणाआत्या ,काका आधीच इहलोक सोडून गेलेले होते. आणि पहिल्या नातवाच्या जन्मानंतर , मोहनच्या वडिलांचेही निधन झालेले होते.
मोहनच्या अपघातानंतर ,गंगाबाई, माणिक सारेजण गोपीला भेटायला आले होते. राहायला स्वतःचे घर होतं. थोडीफार बचत होती, पण तेवढ्यामध्ये चौघांचं निभणार नव्हतं.काहीतरी करावं लागणार होतं .अशा वेळेला माणिक पुढे सरसावला आणि म्हणाला,
” तुम्ही सगळेजण, आपल्याकडे गावी राहायला चला. घर मोठं आहे ,माझ्या मुलांसोबत तुझी मुलं शिकतील ,आणि मोहनराव माझ्यासोबतच ,दुकानाचे, शेतीचं थोडं बहुत काम करतील.”
माणिक म्हणाला आणि गंगाबाईला आणि गोपीला भरून आल्यासारखं झालं .आपल्या पोरीला खंबीर आधार द्यायला भाऊ आहे ,याविषयी गंगाबाईना समाधान वाटलं. होतं.
पण गोपी स्वाभिमानी होती. तिला असं भावाच्या संसारात जाऊन आणि त्याच्यावर अवलंबून राहणं, योग्य वाटत नव्हतं .ती म्हणाली,
” तू मला सोबत चल म्हणालास ,यातच मी भरून पावले. माझ्या अडीअडचणीला, मला माझ्या भावाचा खंबीर आधार आहे ,याचाच मला खरंच आनंद आहे, पण तुझ्याकडे नको. मुलांनाही शहरातून ,गावाकडे सगळा बदल होईल. त्यापेक्षा मला इथेच राहून, काही करता येतं का ?ते बघू दे. अगदीच नाही जमलं, तर तू आहेसच. याविषयी मला खात्री आहे.”
“अगदी निसंकोचपणे ,कुठलीही अडचण असेल ,तर मला हक्काने सांग.”
माणिक ने गोपीला सांगितलं.आणि ‘गोपीने, काय करावं?’ याचा विचार चालू असतांना, तिच्या मनात आलं, की आपल्याला शिवणकला चांगली अवगत आहे. आपण यातच काम सुरू करावं. मशीन शिवण मशीन ,तिने माणिककडे मागितलं. माणिकने आनंदाने, बहिणीची मागणी मान्य केली. ताबडतोब एक चांगल्या प्रतीचे शिवण मशिन त्याने गोपीला आणून दिलं, आणि गोपीचा शिवणकामाचा व्यवसाय सुरू झाला.
त्यात जोडीला मोहनने, नुसतं बसून राहू नये ,म्हणून छोटं किराणा दुकान सुरु झालं. वडिलांचं, भावाचं दुकान , गोपीने लहानपणापासून पाहिलेलं होतं. त्यामुळे स्वतःच्या घरातच ,बाहेरच्या खोलीत, हे छोटसं दुकान सुरू करून, तिने मोहनरावांना ही कामाला लावले. मोहनरावांचा फक्त पाय अधु झालेलला होता. बाकी सगळी बुद्धी तल्लख होतीच ,त्यांनी प्रामाणिकपणे दुकान चालवायला सुरुवात केली .उत्पन्न कमी होतं, परंतु दोघांच्याही मेहनतीने, घरातले सगळेजण आनंदाने राहू शकत होते. मुलांना योग्य ते शिक्षण मिळतच होतं.
काळ आपले चढऊतार दाखवत, सार्यांचं आयुष्य पुढे नेत होता.
माणिक वेळोवेळी आपल्या बहिणीची विचारपूस करत होता. कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीत आपल्या बहिणीने खचू नये, म्हणून त्याची धडपड होती.
हळुहळु गोपीचा शिवण कामामध्ये खूप चांगला जम बसला. आता गोपीने फक्त शिवाणकाम आणि मोहनने छोटसं दुकान, या गुंतून न राहता थोडं मोठं व्हावं ,असा विचार माणिकच्या मनात आला. त्याने आपल्या बहिणीची, गोपीची भेट घेतली.
” अगं ताई! किती दिवस असे छोटे-मोठे कपडे शिवत राहणार तू. भाऊजींचं दुकानही छोटासंच आहे. तुम्ही दोघे जण कपड्यांचं दुकान सुरू करण्याचा विचार का करत नाही? आता जी परिस्थिती आलेली आहे, ती तुम्ही दोघांनी स्वीकारलेली आहे. मग आहे त्यातच थोडीशी वाढ करून, जर मोठं होता आलं, तर का बरं व्हायचं नाही?”माणिक म्हणाला.
“अरे माणिक! दुकान सुरू करणं छोटसं का काम आहे? दुकानासाठी जागा लागेल. त्याच्यामध्ये माल भरण्यासाठी भांडवल लागेल, सध्या जम बसलाआहे,हेच पुष्कळ आहे. लगेच उंच उडी कशी मारणार?”गोपीने आपला दृष्टीकोन सांगितले.
तू काळजी करू नकोस. दुकानाची जागा मी घेऊन देतो. तुला जमतील तसे पैसे परत कर ,आणि दुकानात माल भरण्याचे म्हणशील, तर माझ्या थोड्या ओळखी आहेत. आपण त्या व्यापाऱ्यांशी बोलू .सुरुवातीला उधारीवर कपडे आणू ,छोटी सुरुवात करु. होईल हळूहळू सगळं नीट.
आता तुझा मुलगाही मोठा होत आहे. शिक्षण झाल्यावर कुठेतरी नोकरी करण्यापेक्षा, तो स्वतःचा व्यवसाय करू शकेल. तू सुरुवात तर कर.”माणिक म्हणाला.
भावाने दिलेला थोडासा पाठिंबा आणि स्वतःच्या मनातली ,जिद्द, या जोरावर गोपीने, दुकानाची उडी घ्यायची ठरवलं, आणि छोटसं दुकान सुरू केलं.
सुरवातीला फक्त रोजचे लागणारे कपडे, टॉवेल्स ,नॅपकिन आणि लहान मुलांचे कपडे, एवढाच ठेवलं .त्यातही गोपीने स्वतः शिवलेले ,डिझाइन केलेले ,कपडेही ठेवायला सुरुवात केली. कापडी पिशव्या ठेवायला सुरुवात केली. आता दिवस-रात्र पुरेना .
गोपीने हाताखाली दोन मुली ठेवल्या. आणखीन दोन मशीनही विकत घेतल्या .आता दुकानाची जागा होती. पाठीशी खंबीरपणे उभा भाऊ होता. यशाची वाट आता थोडीशी सोपी वाटत होती.
हळूहळू उत्पन्न वाढत गेलं. माणिक कडून दुकानासाठी घेतलेले पैसे ,गोपीने परत केले . दुकानातला फायदा बघता, बाजूचे दुकानही विकत घेणं तिला सहज जमलं. सुखाचे दिवस परतून आलेले होते.
आपल्या मुलाच्या गणेशच्या लग्नाचे वेध तिला लागले होते. ग्रॅज्युएट होऊन आता तो दुकानातच काम करत होता.
त्यासाठी माहेरच्या गावातली, साधी सालस अशी गीता गोपीला आवडली. भावाला सांगून हे लग्न गोपीने जमवले .भावाच्या मित्राची मुलगी असल्यामुळे,तिची ओळख होतीच.
फारशा काही अडचणी नव्हत्या आणि माणिकच्या मित्राची मुलगी गीता, गोपी च्या घरी, सून म्हणून आली. आणि दुधात साखर मिसळावी तशी ,त्यांच्या कुटुंबामध्ये सामावून गेली.
गणेशच्या लग्नाला दोन-तीन वर्ष झाले आणि गोपीला नातवंडाचा तोंड बघण्याची आस लागली.
गीताने गोड बातमी दिली.गोपीकडे नातीच्या रुपात आनंद आला.
सारे काही मजेत चाललेलं होतं गुंजनही शिक्षण घेत होती. दोन तीन वर्षातच तिच्या लग्नाचं हे बघावं लागणार होतं.
खुप सुंदर कथा कायम पुढे काय याची उत्सुकता असतेच आता मन गुंजन मध्ये अडकले हं!
Khup chhan