ब्रम्हचर्य

ब्रम्हचर्य धर्माचा आदर्श

शीलसुंदरी अनंतमती

चंपापुरी अंगदेशाची राजधानी होती. तेथील राजा प्रियदत्त आणि त्याची राणी अंगवती यांची कन्या अनंतमती. अतिशय गुणी रूपवान आणि सुंदर .लहानपणापासून तिला बाहुला-बाहुलीचे लग्न लावण्याचा खेळ , फार आवडायचा.
तिचा हा लग्नाचा खेळ थांबवून, तिला दुसरीकडे वळवण्याचा राजाने खूप प्रयत्न केला होता, परंतु अनंतमती याच खेळामध्ये बऱ्याचदा मग्न असायची.
एकदा अष्टान्हिका पर्व चालू होते. त्यावेळेला राजा प्रियदत्ताने धर्मकीर्ती महाराजां जवळ ,आ दिवसासाठी ब्रह्मचर्य व्रत घेतले आणि त्याच वेळी, अनंतमतीलाही,गंमत म्हणून ब्रह्मचर्य व्रत दिले. पण अनंतमतीनेही ते ब्रह्मचर्य व्रत श्रद्धापूर्वक ग्रहण केले.
त्यानंतर ती वयात आली, तिचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं. राजाला आता तिच्या विवाहाचे वेध लागले. त्यादृष्टीने त्याने वरसंशोधन सुरू केले.त्यांची तयारी पाहुन. अनंतमतिने त्यांना अडवले, आणि विचारले,
” पिताश्री !माझे तर ब्रह्मचर्य व्रत आहे. मग हे विवाहाचे आयोजन कसे?”
प्रियदत्ताला काहीच कळेना .त्याने अनंतमतिला विचारले,
“कसले ब्रह्मचर्य व्रत?”
तिने त्यांना आठवण करून दिली. “धर्मकीर्ति महाराजांकडे अष्टिन्हिका पर्व चालू असताना, मी ब्रह्मचारी व्रत घेतलेले आहे.”
राजा प्रियदत्त तिला म्हणाला,” अगं त्यावेळेला मी गमती गमती मध्ये तुला हे व्रत दिले होते, आणि ते व्रत फक्त आठ दिवसासाठी होते .”
“पण पिताश्री त्या वेळेला तुम्ही किंवा मुनी महाराजांनी कोणीही मला हे व्रत आठ दिवसासाठी आहे ,हे सांगितलंच नाही. मी तर आता हे व्रत आजन्म पाळणार.”
प्रियदत्ताने विविध प्रकारे अनंतमतीला समजण्याचे प्रयत्न केले, परंतु तिने आपला निग्रह कायम ठेवला आणि सांगितले की मी आजन्म ब्रह्मचारी राहणार आणि धर्म ध्यान करत राहणार.
प्रियदत्ताचा नाईलाज झाला आणि त्याने अनंतमतीच्या विवाहाचा विषय सोडून दिला.

एके दिवशी चैत्र महिन्यामध्ये, अनंतमती, बागेमध्ये . झोपाळ्यावर झोके घेत होती. त्यावेळेला आकाश मार्गाने कुंडलमंडित नावाचा विद्याधर ,आपल्या प्रिय पत्नीसोबत आकाश मार्गाने विहार करत होता. त्यावेळी त्याची दृष्टी, स्वरुपसुंदर अशा अनंतमतीवर पडली, आणि त्याच वेळी तो तिच्यावर मोहित झाला, परंतु त्याची प्रिया,पत्नी,सोबत असल्यामुळे तो काहीही करू शकत नव्हता. त्याने आपल्या प्रियेला घरी सोडले आणि लगेचच पुन्हा जिथे अनंतमती, झोपाळ्यावर झुलत होती तिथे आला आणि नंतर तिला आपल्या विमानात बसवून तो पळवून, नेत होता.
तेवढ्यातच कुंडलमंडिताची ,प्रिया, त्याच्या मागोमाग आलेली होती, अनंतमतीसोबत, त्याला पाहून ती रागाने लाल झाली, आणि आपली प्रिया आपल्यामागे आहे, हे बघून कुंडलमंडित घाबरला आणि घनदाट वनामध्ये त्यांने तिला खाली सोडले.
घनदाट वनामध्ये एकटी असलेली अनंतमती घाबरली. तिथे एक भिल्लांचा राजा आला. भिल्लांच्या राजाची नजर अनंतमतीवर पडली. त्याच्या मनात वासना उत्पन्न झाली तो आपल्या शीबीरामध्ये ,तिला घेऊन गेला तिथे तो तिच्यावर जबरदस्ती करत होता . तिच्याशी विवाहाची इच्छा करत होता.अनंतमती त्याला विरोध करत होती.
तेवढ्यात तिथे वनदेवी प्रगट झाली. तिने अनंतमतीच्या शीलाचे रक्षण केलं, आणि भिल्लाला शिक्षा दिली. वनदेवीचे अनंतमतीला असलेले संरक्षण बघून ,भिल्ल घाबरला आणि त्याने शहरांमध्ये येऊन, पुष्पक सेठ नावाच्या एका शेठजींकडे,अनंतमतीला सोपवले
पुष्पक शेठजींच्या मदतीने ,आपण आपल्या घरी जाऊ शकू अशी आशा , तिच्या मनामध्ये निर्माण झाली, परंतु पुष्पकशेठच्या मनातही ,अनंतमतीचा सौंदर्य पाहून, कामवासना जागृत झाली आणि त्याने तिच्या सौंदर्याचा उपभोग घेण्याची इच्छा,त्याने तिच्यासमोर व्यक्त केली.
त्याचे बोलणे ऐकून नंतर तिने त्याचा धिक्कार केला,
” माझ्या पित्याच्या वयाच्या असणाऱ्या शेठजी !तुम्ही हे काय करत आहात? हे तुम्हाला शोभते का ?”
असं नाना प्रकारे त्याला सुनावून अपमान केला. तिचे बोलणे ऐकून पुष्पकशेठला तिचा खूपच राग आला .परंतु तिच्यासमोर तो राग न दाखवता ,पुष्पकशेठने, तिला धडा शिकवण्याचे ठरवलं आणि कामसेना, नावाच्या एका वेश्येच्या स्वाधीन तिला केलं.
कामसेनेने ,विविध प्रकारे अनंतमतीला ,त्रास दिला साम-दाम-दंड-भेद सर्व गोष्टींचा उपयोग करून, तिच्या मनाला वळवण्याचा प्रयत्न केला, पण अनंतमती दृढनिश्चयी होती. तिच्या ब्रह्मचर्य पालनव्रतावर, ठाम होती. आपले कोणतेही उपाय अनंतमती समोर चालत नाही ,हे बघून ,वेश्येने तिला नगराचा राजा, सिंहराजा यांच्या स्वाधीन केले.
बिचारी अनंतमती.कर्मगती फिरवत होती. शीलाचे रक्षण करण्यासाठी ,ब्रह्मचर्य व्रत घेतलेली,अनंतमती असहाय्यपणे येणार्‍या प्रसंना सामोरे जात होती.
सिंहराजा च्या मदतीने, आपण सुखरूपपणे आपले पिता प्रियदत्त, यांच्यापर्यंत पोहोचू शकू ,अशी आशा तिच्या मनात निर्माण झाली. पण सिंहराजालाही, अनंतमतीवर मोह झाला. तो तिला त्रास देत होता,पण पहिले, ज्या देवीने तिचे रक्षण केलं होतं, तीच वनदेवी तिथेही प्रगट झाली आणि सिंह राजाला , शिक्षा करून त्याला, चुकीची जाणीव करून दिली. देवीने अनंतमतीच्या शीलाचे पुन्हा रक्षण केलं.
अनंतमती कोणत्याही उपायाने आता बधणार नाही, आपल्याला वश होणार नाही ,हे बघून सिंहराजाने अनंत मातीला घोर वनामध्ये सोडून देण्याचा आदेश दिला. राज आज्ञेचे पालन झालं ,आणि अनंतमतील घोर वनामध्ये सोडून देण्यात आलं.
जिथे तिला सोडलं होतं ,तिथून वाट फुटेल तिकडे अनंतमती चालत निघाली. वनात मिळणार्‍या फळांवर गुजराण करत, अडथळ्यांना पार करत, मार्गक्रमण सुरू झालं.
अखेर ती अयोध्या नगरी मध्ये पोहोचली. तिथे पद्मश्री माताजी, एका जिनमंदिरामध्ये विराजमान होत्या. त्यांच्यापत ती पोहचली. आपली कहाणी तिने त्यांना सांगितली. त्यांनी तिला आपल्यासोबत राहण्याची परवानगी दिली.त्यांची सेवा करण्यात ती लीन झाली.आणि अयोध्येत राहु लागली.

अनंतमती नाहीशी झाल्यावर प्रियदत्त राजाचे कशातच मन लागत नव्हते, त्याने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला .शेवटी मनाला शांतता मिळवण्यासाठी आणि तिचा शोध घेण्यासाठी, प्रियदत्ताने तीर्थ यात्रेला सुरुवात केली. त्याच्यासोबत त्याच्या परिवारातल्या काहीजण आणि नगरामधले काही जण निघाले .
तीर्थयात्रा करत करत ते सर्वजण ,अयोध्येला पोहोचले. अयोध्येमध्ये प्रियदत्ताचा, मेहुणा, बायकोचा भाऊ जिनदत्त राहत होता. प्रियदत्त त्यांच्या घरी गेला. सकाळी जिनमंदिरामध्ये प्रियदत्त आणि जिनदत्त मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले, त्याच वेळेला पद्मश्री माताजींचा आहार जिनदत्तच्या होता, त्यामुळे मदतीसाठी अनंतमती जिनदत्तच्या घरी आलेली होती.
जिनदत्तने आणि त्याच्या पत्नीने खूप बालपणी अनंतमतीला पाहिलेले असल्यामुळे, तिला ओळखण्याचा प्रश्नच नव्हता. अनंतमतीने ,जिनदत्ताच्या घरी,त्याच्या पत्नीला मदत केली आणि नंतर,अंगणामध्ये सुंदरशी रांगोळी काढली, आणि ती निघून गेली.
प्रियदत्त मंदिरातून परतला. दारासमोरची रांगोळी बघून प्रियदत्तला अनंतमतिची आठवण झाली.अशीच रांगोळी ती काढत असे.
त्याने जिनदत्तच्या, पत्नीलाही रांगोळी कोणी काढली? असं विचारलं, त्याच्या पत्नीने पद् मश्री माताजींचे सोबत, राहणाऱ्या एका कन्येने ,ही सुंदर रांगोळी काढलेली आहे, असे सांगितले.
त्याचबरोबर प्रियदत्ताने ,त्या कन्येला, भेटण्याची इच्छा प्रदर्शित केली. जिनदत्त आणि प्रियदत्त लगेच पद्मश्री माताजी जवळ गेले. तिथे अनंतमतीला पाहून, प्रियदत्तला खूप आनंद झाला. अनेक वर्षानंतर त्याला ,आपली कन्या भेटली होती. अनंतमतीला, प्रेमाने जवळ बसवून प्रियदत्ताने तिचा वृत्तांत विचारला.
अनंत मातीवर आलेल्या नाना संकटांना ऐकून ,प्रियदत्तच्या आणि उपस्थितांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. एवढे कठीण प्रसंग येऊनही अनंतमतीने आपल्याशी व्रताला कायम ठेवले होते.
आपल्या कन्येच्या भेटल्यामुळे प्रियदत्त राजाला खुप आनंद झाला. त्याने या निमित्ताने गावामध्ये रथयात्रा काढली .
प्रियदत्ताने अनंतमतीला, सोबत चंपापुर नगरीमध्ये परत चलण्याचा आग्रह केला, परंतु नंतर ती म्हणाली,
” पिताजी या संसारामध्ये मी खूप फिरले .वेगवेगळे अनुभव घेतले .आता मला वैराग्य आलेले आहे. कृपया मला दीक्षा घेण्याची परवानगी द्या.”
प्रियदत्त म्हणाला,
” अजून तुझे वय खूप कमी आहे. अनंतमती! या वयामध्ये दीक्षा घेणे योग्य ठरणार नाही. दीक्षा घेतल्यावर खूप परीषह, सहन करावे लागतात .त्यासाठी अजून तुझी तयारी नसेल. त्यापेक्षा तू इथे राहून ,धर्माचे अध्ययन कर. योग्य वेळ आली की दीक्षा घे.”
प्रियदत्त ने जरी असे म्हटले होते तरी, अनंतमतीच्या, मनामध्ये मात्र वैराग्य निर्माण झाले होते. तिने पद्मश्री माताजीं कडे प्रार्थना करून आर्यिका दीक्षा ग्रहण केली.
जीवन अंतापर्यंत कठोर व साधना केली. मरणानंतर तिच्या शीलव्रताच्या, पालनाचे फळ म्हणून, ती स्वर्गामध्ये देव झाली.
आजच्या उत्तम ब्रह्मचर्य या दशलक्षण धर्माच्या निमित्ताने शीलसुंदरी अनंतमतीची ही थोडक्यात कथा.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *