पुण्यात्मा जीवंधर
भाग ४
©भाग्यश्री मुधोळकर
दुसरीकडे दृष्ट काष्ठांगाराने ,एक दिवस मंत्र्यांची सभा घेतली. त्यांना सांगितलं ,
“मंत्रीगण! गेले काही दिवस माझ्यासोबत एक विचित्र प्रकार घडत आहे ,त्यामुळे गेले कित्येक दिवस मला, आपल्या सगळ्यांना तोंड दाखवायला, लाज वाटत आहे.रात्रभर झोप येत नाही.एक देव, रोज येऊन मला त्रास देतो, आणि सांगतो, सत्यंधराला मारून टाक. मला असं करणं योग्य वाटत नाही ,परंतु तो देव मला अशा प्रकारे वागण्यासाठी लाचार करत आहे.मला धमकावत आहे. माझ्या मागे लागला आहे, खूप त्रास देत आहे.”
काष्ठांगाराच्या बोलण्याला त्याचा मेहुणा, मंथन याने समर्थन दिलं.
“राज्याची व्यवस्था नीट चालण्यासाठी ,काष्ठांगाराची, प्रकृती उत्तम राहणं आवश्यक आहे .त्या देवाची आज्ञा मानली नाही, तर त्यांचे प्राण संकटात येतील .विषय वासनेचा शिकार असणारा सत्यंधर, राज्यसंचलनाला योग्य नाही. कामातूर असल्याने,आपल्या प्रजेची सुरक्षा आणि सुव्यवस्था ठेवू शकत नाही. प्रजा नेहमी आपल्या राजाचं अनुकरण करते, त्यामुळे अशा राजाचं मरणच योग्य आहे”
काष्ठांगार आणि त्याचा मेहुणा मंथन यांचं बोलणं ऐकून सर्व मंत्री आश्चर्यचकित झाले .ते सत्यंधर राजाचे हितचिंतक आणि राजभक्त होते. सत्यंधराचे अनिष्ट आणि अपमान करण्याचा विचार ,त्यांना खूप वाईट वाटला.
परंतु काष्ठांगाराचा नीचपणा त्यांना माहीत होता, त्यामुळे त्याच्या समोर, बोलण्याचं धाडस कोणातच नव्हतं. ज्यावेळी सारे मंत्रीगण एकमेकांचं तोंड बघत गप्प बसले होते त्,यावेळी या मंत्रांमध्ये ,एक मंत्री धर्मदत्त ,जो आपल्या नावाप्रमाणे, खरोखरच धर्मदत्त होता अन्याय आणि अनितीला विरोध करणारा होता. न्यायनीती विषयी. बोलतांना स्वतःच्या प्राणाची चिंता न करणारा होता तो निर्भय होऊन म्हणाला,
” राजा सत्यंधर न्यायनीती ने वागणारे ,आदर्श शासक आहेत. त्यांनी आपल्या जीवनामध्ये आतापर्यंत, चांगलीच काम केलेली आहेत. प्रजेच्या कल्याणाचा विचार केलेला आहे .त्यांच्या राज्यात सिंह आणि हरिण एका घाटावर पाणी पितात .प्रजेमध्ये, त्यांच्याविरुद्ध लेशमात्र क्षोभ नाही. सर्वजण सुखशांतीने राहत आहेत अशा नाही धर्मपरायण राजाला मारण्यासाठी, कोणताही देव प्रेरणा देणार नाही. तुम्हाला एवढ्या उच्च पदावर त्यांनी राज्यकारभार बघण्यासाठी त्यांनीच बसवले आहे. त्या राजा सत्यंधराचा विश्वासघात ,करण्याची, गोष्ट तुमच्या स्वप्नातही यायला नको. त्यामुळे राजा सत्यंधराला मारण्याचा विचार मनातून काढून टाका. सत्यंधर राजा आपल्या पत्नीसोबत ,रमण करतात. हा दुराचार किंवा अत्याचार नाही .ते असत्य ,व्यभिचार ,या दुर्गणांपासून, दूर आहेत.त्यांच्या शासनात ,धर्मनीती सदाचार ,सुरक्षित आहे. अशा उपकारी भूपतीचा सदैव सन्मान केला पाहिजे. मंत्र्याचे कार्य आपल्या शासकाला, योग्य सल्ला देण्याचं असतं .ते कार्य मी करत आहे.”
धर्मदत्त मंत्र्याचं, सत्य हितकारी वचन ,काष्ठांगाराला, खूप कडू वाटलं. कारण ते त्याच्या ,स्वार्थ साधनेमध्ये अडसर निर्माण करणारं होतं. त्यामुळे काष्ठांगाराने, धर्म दत्ताच्या नीतीवर बोलण्याला उत्तर दिले नाही, पण त्याने त्यांच्याकडे लक्षही दिलं नाही.
उलट धर्म दत्ताला बंदी बनवुन कोठडीमध्ये पाठवून दिलं. तो स्वतःच्या मनाने. ठरवलेल्या मार्गाने निघाला.
काय करणार होता तो?
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर