जीवनगाणे

क्षणभर विश्रांती

“आई हे तुमचं वाढदिवसाचं गिफ्ट” असे म्हणत अवनीने ,मधुराच्या हातात एक पाकीट ठेवले. त्यामध्ये दुसऱ्या दिवशीचे ,तिच्या भावाकडे, नागपूरला जाण्याचचे तिकीट होते. “अगं असं अचानक कसं जाऊ भाऊकडे ? इथे आईं कडे कोण लक्ष देणार? तुला तर माहित आहे ना ,त्या बेड रिडन आहेत. तुझंही ऑफिस असतं .दिवसभर कोणीतरी घरी लागते ना !” मधुरा खरं […]

क्षणभर विश्रांती Read More »

मायमराठी

मराठी भाषेच्या साहित्यातील दिंडीचे आम्ही संपन्न वारकरी, शिकलो मराठी ,बोलतो मराठी, आणि लिहितो ही मराठी . व्यक्त होण्यास आधार हीच भावना करी योग्य साकार हीच, हिची खास संगत असे सोबतीला मनाशी संवाद साधण्यासाठी. कौतुके हिची करती थोरमहान आम्ही पामरांनी काय सांगावे शिकलो मराठी,बोलतो मराठी आणि लिहितोही मराठी. भाग्यश्री मुधोळकर

मायमराठी Read More »

ब्रेकचे सॅशे

विद्या आरशात बघून तयार होत होती. छानसा नेव्ही ब्ल्यू कलरचा डिझायनर वनपीस, त्याच्यावर मॅचिंग लोंबते इयरिंग्स आणि पर्स,हलका मेकअप. स्वतःकडे बघून ती प्रचंड खुश झाली. आज बर्‍याच दिवसांनी ती मैत्रिणींसोबत चित्रपट बघायला मॉल मध्ये जाणार होती. पिक्चर बघायचा, खायचं प्यायचं आणि थोडीशी विंडो शॉपिंग. चार-पाच तासाचा अगदी छान ब्रेक. रोजच्या रुटीन आयुष्यातून.सर्व धमाल करून घरीआल्यावर

ब्रेकचे सॅशे Read More »

सूर निरागस हो

सूर निरागस हो अवंती आकाशच्या आँफिस मध्ये बसलेली होती,त्याच्या बॉस समोर. अपाॅईंटमेंट लेटर घेण्यासाठी.पंधरा दिवसापूर्वी तो कोरोनाने त्यांच्यातून निघून गेलेला होता.चार दिवसात होत्याचे नव्हते झाले. खूप मोठे आव्हान तिच्यापुढे ठेवून,तो निघुन गेला. दोन छोट्या मुलींचा सांभाळ करण्यासाठी, तिला बाहेर पडावे लागणारच होते. अनुकंपा तत्वावर, त्याच्या बॉसने, तिला झेपेल अशी नोकरी ,तिथे देण्याचे तयारी दर्शवली होती.

सूर निरागस हो Read More »

education impact

जगणे व्हावे गाणे

“अगं या शुक्रवार -शनिवारी शंकराचार्य हाॅलमध्ये. गाण्यांचा कार्यक्रम आहे .दोन दिवसांचा महोत्सव आहे ,येतेस का तू “समिधा,चा माझ्या मैत्रिणीचा फोन आला, खरंतर शुक्रवार शनिवारची खूप मोठी काम उभी होती डोळ्यासमोर. पण मी पटकन, तिला नाही म्हणाले नाही. म्हटले ,”मी तुला दोन तासात कळवते माझी कामे अॅडजस्ट करते आणि नक्की येते.” गेल्या दोन वर्षात प्रयत्नपूर्वक केलेल्या

जगणे व्हावे गाणे Read More »