मराठी भाषेच्या साहित्यातील
दिंडीचे आम्ही संपन्न वारकरी,
शिकलो मराठी ,बोलतो मराठी,
आणि लिहितो ही मराठी .
व्यक्त होण्यास आधार हीच
भावना करी योग्य साकार हीच,
हिची खास संगत असे सोबतीला
मनाशी संवाद साधण्यासाठी.
कौतुके हिची करती थोरमहान
आम्ही पामरांनी काय सांगावे
शिकलो मराठी,बोलतो मराठी
आणि लिहितोही मराठी.
भाग्यश्री मुधोळकर