पुण्यात्मा जींवधर – 18
भाग १८
भाग्यश्री मुधोळकर
गंधर्वदत्ताने स्वतःच्या हातामध्ये, स्वतःची वीणा घेतली. जींवधरने स्वतःच्या हातात, त्याची घोषवती विणा घेतली. दोघांची जुगलबंदी सुरू झाली. जींवधर ,वीणावादनात पारंगत होताच. त्यासाठी त्याने दीर्घकाळ साधनाही केली होती. त्यामुळे ज्या वेळेला जींवधर वीणा वाजवत होता, त्यावेळी संपूर्ण स्वयंवर मंडपामध्ये ,अपूर्व शांतता होती. संपूर्ण जनता मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती.
ज्या वेळेला तो पंचम स्वरात इलाप घ्यायचा, त्यावेळेला श्रोत्यांच्या मनात तरंग उमटत. जीवंधराच्या जुगलबंदीला, उत्तर देण्यासाठी ,गंधर्वदत्ताने प्रयत्न केला. पण ती जीवंधरापेक्षा आकर्षक वीणा वाजवत शकली नाही.
ती जींवधराशी बरोबरी करू शकत नाही ,हे लक्षात येताच तिने आपली वीणा जमिनीवर ठेवली. गंधर्व दत्ताने वीणा जमिनीवर ठेवताच, जींवधराराच्या मित्रांनी, नंद गोपाल आदि गोपाळ मंडळींनी ,गंधोत्कटाच्या प्रिय जनांनी आणि राजापुरीच्या जनतेने, जीवंधराचा जयजयकार केला.
त्या जय जय कारा ने , स्वयंवर मंडप दुमदुमून गेला. सर्व उपस्थित लोकांनी गंधोत्कटाचे अभिनंदन केले.
जीवंधराचे अभिनंदन केले. दुसरीकडे जीवंधरा सारखा सर्वगुणसंपन्न, सुंदर ,रुबाबदार पती मिळाला, म्हणून गंधर्वदत्ता ही प्रसन्न झाली. तिच्या दासीने प्रसन्न होऊन, गंधर्वदत्ताचा हातात पुष्पमाला दिली. गंधर्वदत्ता , नयन खाली झुकवून, जींवधराकडे सुपाहत होती. रोमांचित झालेल्या मनाने, आपल्या थरथरणाऱ्या हाताने, वरमाला, तिने जींवधराच्यि गळ्यात घातली. विराट हर्ष, तिच्यि मनात झाला.
जनता जींवधराचा जय घोष करायला लागली गंधर्व दत्ता स्वतःला भाग्यवान समजत होती ,की तिला जीवंधरा सारखा पती मिळाला जीवंधराच्या विजयामुळे ,सर्वांना हर्ष झाला, पण काष्ठांगाराला मात्र दुःख झाले. त्यात जमलेल्या राजांनी काष्ठांगाराला ,जींवधराविषयी भडकावले, की ही मूळ सुंदर कन्या ,खरं तर एखाद्या राजपुत्राची पत्नी, व्हायला हवी होती ,परंतु एक वैश्य पुत्र हिचा पती कसा होऊ शकतो? याला आपण दंड केला पाहिजे.
काहीजणांनी हा मनावर घेतलला नाही, त्यांनी सांगितलं की, स्वयंवराची मर्यादा तोडणे, क्षत्रियांचा काम नाही. जींवधराने , विजय मिळवला आहे, तर तो या कन्येचा पती आहे .
काही इरसाल व्यक्तीनी ,काही राजांनी, काष्ठांगारला, जींवधराला मारुन , गंधर्वदत्ताला, हिरावून घेतलं पाहिजे असा सल्ला दिला.
काष्ठांगाराने त्याला साथ देणार्या, काही राजांच्या साथीने,जींवधर आणि त्याच्या मित्रां वर हल्ला केला, परंतु जीवंधर फक्त वीणावादनातच पारंगत नव्हता, तर शस्त्र कलेत निपुण होता.
त्याने लगेचच आपली वीरता , स्वंयवर मंडपातच दाखवायला सुरुवात केली. त्याचे ते त्याचं शौर्य पाहून, आक्रमण करणाऱ्या राजांनी, आणि इतरांनी , काढता पाय घेतला हे सांगायला नकोच.
ही सारी घटना श्रीदत्त शेठजी बघत होते .आपण आपल्या मित्राच्या कन्येसाठी, फक्त वीणावादनातच नव्हे, तर युद्ध कलेत ही निपुण असणारा चांगला वर निवडलेला आहे, हे बघून, त्यांना समाधान वाटलं. स्वयंवर मंडपातच, विवाह मंडपाची रचना करण्यात आली आणि तिथे जीवंधर आणि गंधर्व दत्ताचा विवाह संपन्न झाला.
गंधर्वदत्ताला घेऊन जींवधर घरी आला .गंधोत्कट आणि सुनंदाला ,आपल्याला सुंदर आणि गुणी आपत्याला ,गुणी,सुंदर पत्नी .मिळाल्याचा आनंद ,त्या दोघांना झाला .
जींवधर आणि गंधर्व दत्ता एकमेकांसोबत, प्रेमाने आणि एकमेकांचा सन्मान करत ,आपले वैवाहिक जीवन जगायला लागले.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर