त्याग

त्यागाचे पालन दानातून

१.मोतीचंद शेठजींचा, गावामध्ये मोठा कपड्यांचा वापर होता. लाखोंमध्ये उलाढाल नेहमी होत असे. वार्षिक कमाईही लाखो मध्ये होती. परंतु खर्च करण्यामध्ये मोतीचंदजी खूपच कंजूष होते. स्वतः घरामध्ये काटकसरीत राहायचे ,धर्माच्या नावाने दानासाठी ,तर तिच्या अंगावर काटा यायचा. कितीही मोठं धार्मिक कार्य असो, एखादे समाजोपयोगी काम असो, शेटजींनी कधीही ,कुठेही दान दिलेलं नव्हतं.
एकदा गावातल्या आदिनाथ मंदिरातल्या ट्रस्टींना, जाणीव झालं की आपल्या गावामध्ये सर्व सुविधांनी युक्त ,असं एक मोठा हॉस्पिटल असण्याची गरज आहे. आपण गावामधले सर्वजण एकत्र आलो आणि दान जमा केलं तर सहजतेने हे काम पूर्ण होऊ शकेल.
त्या ट्रस्टींमध्ये नवीनचंद,नावाची व्यक्ती होती. त्यांना एक छान कल्पना सुचली, त्यांनी सर्वांशी चर्चा केली आणि त्यांनी,सांगितलेल्या, पद्धतीने दान जमा करण्याची नवीन युक्ती सारेजण वापरणार होते.
दुसऱ्या दिवशी सकाळी ट्रस्टीगण, मोतीचंद शेठजींकडे गेले. मंदिरातले ट्रस्टी दारात उभे आहेत, असे नोकराने सांगतात मोतीचंदजींच्या मनामध्ये हे लोक ,काहीतरी दान मागायला आलेले आहेत ,अशी शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी आपल्या मुलांकरवी निरोप पाठवला की मला काही तुम्हाला भेटण्यास रस नाही, मी कोणत्याही प्रकारचे दान देणार नाही .
ट्रस्टी त्या मुलाला म्हणाले,” आम्ही मोतीचंदजींकडे दान मागायला आलेलो नाही. फक्त त्यांची भेट हवी आहे .”
मुलाने असे म्हणताच मोतीचंदजी ट्रस्टींना भेटायला तयार झाले.
ट्रस्टींनी मोतीचंद शेठजींपुढे आपली चोपडी केली.त्या चोपडीमध्ये गावातल्या लोंकांकडून ,दानाच्या स्वीकृतीची रक्कम लिहिली जात असे.
शेठजी म्हणाले,” तुम्ही तर आत्ताच माझ्या मुलाला म्हणाला होतात की कोणत्याही प्रकारचं दान आम्हाला नको आहे, मग ही चोपडी माझ्यासमोर कशाला धरत आहात?”
“तुम्ही दान देऊ नका फक्त तुमचं नाव एक दिवस आम्हाला वापरायला द्या.”ट्रस्टी म्हणाले.
“फक्त नाव वापरणार .म्हणजे काय करणार ?”शेठजींनी विचारले.
ट्रस्टींनी मोतीचंदजींना समजावलं ,”या चोपडीवर आम्ही सगळ्यात वर तुमचं नाव लिहिलेलं आहे, आणि त्यापुढे पाच लाख रुपये ही रक्कम लिहिलेली आहे .त्याच्या पुढे तुम्ही फक्त सही करा.”
“पाच लाख कसले ?मी तर पाच रुपये सुद्धा तुमच्या कुठल्या कामासाठी देणार नाहीये.” पतीचं शेठजी ठामपणे म्हणाले.
“तुम्ही पैसे देऊच नका. उद्या सकाळी तुम्ही तुमचं नाव परत घेऊन टाका. फक्त आज दिवसभरासाठी या चोपडी मध्ये पहिल्या क्रमांकावर तुमचं नाव असू देत आणि त्यापुढे पाच लाख रुपये ही रक्कम असू देत.”ट्रस्टी म्हणाले.
“आज तुम्ही लोक असं बोलताय. आपण उद्या तुम्ही जर खरोखरच पाच लाख रुपये मागितलेत,तर… हे काही मला चालणार नाही. हे सगळं तुम्ही, एक दिवस माझं नाव वापरण्यासाठी करत आहात ,असं मला लिखित पत्र द्या. माझ्याकडंन काहीही पैसे घेणार नाही आहात, हेही स्पष्ट लिहा.”शेठजी म्हणाले.
शेठजी असंच काहीतरी बोलणार, याचा अंदाज ट्रस्टींना होताच .
“तुम्ही म्हणाल तसं.” असं म्हणून त्यांनी मोतीचंद शेठजींना, हवं तसं पत्र लिहुन दिलं आणि त्यांच्या नावापुढे पाच लाख रुपये लिहून, त्यांची सही घेतली.
पुढे चोपडी घेऊन ट्रस्टीगण, मोठमोठ्या रथी-महारथी, श्रेष्ठी, सावकार, श्रावक यांच्या घरोघर गेले. त्या दिवशी त्यांचा दिवस खूप चांगला होता, किंवा एक खूप चांगलं काम ते गावासाठी समाजासाठी करणार होते म्हणून म्हणा, पण त्यांना एक कोटी दान दानाची अपेक्षा होती ,त्यावेळी जवळपास दीड कोटींचे दान जमा झालं.
सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज असं चांगलं हॉस्पिटल त्यांच्या गावात नक्की उभा राहणार होतं. रम श्रावकांनी ,श्रेष्ठींनी अहमहमिकेने दान दिलेलं होतं ,कारण मोतीचंदजींचं नाव, सगळ्यात वर होतं.
अत्यंत कंजूस म्हणून प्रसिद्ध असणाऱ्यांनी पाच लाख दिलेले आहेत, तर आपणही शक्य तितके जास्त दान देऊ या. असा विचार प्रत्येकाने केला आणि अपेक्षेपेक्षा जास्त दान ट्रस्टींकडे जमा केलं.
दुसर्‍या दिवशी ट्रस्टी , चोपडी घेऊन मोतीचंदजींचे नाव कमी करण्यासाठी, मोतीचंदजींकडे गेले. त्यांच्या येण्याची, वार्ता कळताच, मोतीचंद स्वतः ,त्यांच्या स्वागतासाठी पुढे झाले. त्यांना मानाने बसवलं.
ट्रस्टी म्हणाले ,की काल आम्ही तुम्हाला जसं कबूल केलं होतं, त्याप्रमाणे आता या चोपडीतलं नाव ,तुमच्यासमोर मी आम्ही खोडून, टाकत आहोत. ते दाखवण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत.”
मोतीचंदजी म्हणाले,” नाव खोडण्याची काहीही आवश्यकता नाही. मी खरोखरच पाच लाखाचे दान, या हॉस्पिटलच्या बांधकामासाठी देत आहे.”
ट्रस्साठी हा आश्चर्याचा सुखद धक्का होता.
” यामागचे कारण काय हे कळू शकतील का शेटजी?” एका ट्रस्नी विचारलं.
“सकाळी तुम्ही माझं नाव लिहून, इथून गेलात. त्यानंतर जिथे जिथे गेलात, तिथे तिथे तुमच्याकडे ,चांगलेच दान जमा झालं. त्याचबरोबर ज्या ज्या लोकांनी माझं नाव वाचलं, त्या त्या लोकांचे, बर्‍याच जणांचे, अभिनंदनाचे फोन, निरोप, माझ्या दानाची अनुमोदन करणारे आले. मला काहीजण, येऊन भेटले आणि त्यिंनी माझं कौतुक केलं. मोठ्याप्रमाणावर सन्मान दिला.लाखो, करोडो रुपये कमावून ,जे आत्मिक समाधान मला मिळाले नाही, ते मला फक्त, मी तुम्हाला एका दिवसासाठी माझं नाव वापरायला दिलं, म्हणून मिळालं, खरोखर मी जर हे दान केलं तर ,जे पुण्या मी जमा करेन, याचा विचार काल दिवसरात्र मी करत होतो आणि मला माझ्या धनाचा योग्य उपयोग करण्याचा मार्ग सापडलेला आहे. या कामासाठी तर मी पाच लाख रुपये दान देतच आहे, पण यापुढेही कधीही कुठलेही काम तुम्ही करणार असाल, तर सगळ्यात आधी माझ्याकडे या.”
असं म्हणून मोतीचंदजींनी पाच लाखाचा चेक मंदिरच्या ट्रस्जवळ जमा केला. उत्तम त्यागधर्म त्यांनी त्यांच्या आचरणामध्ये आणला होता.

मुनिश्री प्रणाम सागर जी महाराज यांच्या गेल्यावर्षीच्या प्रवचनावर आधारित ही गोष्ट आहे

२.कैवल्याचा आज पहिला पगार झालेला होता. शिक्षण पूर्ण झाल्यावर महिना-दोन महिने प्रयत्न केल्यावर, त्याला हव्या तशा पॅकेजची ,हवी त्या कंपनीमध्ये ,छान नोकरी मिळाली होती.
त्याने घरातील, सर्वांसाठी आपल्या पगारातून खूप छान छान गिफ्ट घेतले होते. सर्व जण खूष झाले.
घरी सर्वजण निवांतपणे ,कैवल्याच्या पहिल्या पगाराचा आनंद साजरा करत होते. इतक्यातच गावातल्या धर्मादाय औषधालयातील माणूस घरी आला.
” कैवल्य दादा !तुम्ही तुमची पावती तिथेच विसरून आलात.”असं म्हणून त्यांनी कैवल्याच्या हातामध्ये त्याने एक पावती ठेवली.
“कायरे काय वाटलं कसली ही पावती ?”बांबांनी विचारले.
“बाबा मी लहानपणापासून बघत आलो आहे, की तुम्ही तुमच्या कमाई मधून, 10 टक्के रक्कम कुठे ना कुठे दान करत असता, म्हणून मीही ,माझ्या पहिल्या पगारातील, दहा टक्के ,आपल्या गावातील धर्मादाय औषधालया मध्ये दान करून आलेलो आहे. नंतरही आयुष्यभर मी जे काही कमवेन, त्यातली 10 टक्के रक्कम सामाजिक ,धार्मिक, मंदिर जीर्णोद्धार ,अशा वेगवेगळ्या कामांसाठी देणगी म्हणून देतच राहणार आहे.”कैवल्य म्हणाला.
आपल्या कृतीतूनच कैवल्याच्या आई-बाबांनी त्याच्यावर त्याग धर्माचे संस्कार ,लहानपणापासूनच केलेले होते. त्याला वेगळी जाणीव करून देण्याची गरज त्यांना राहिली नाही.

उत्तम त्याग धर्म अर्थात दान करण्याचा धर्म याविषयी लिहावं तेवढं थोडंच. आपल्या धर्मामध्ये आहारदान ,अभयदान, औषधंदान, शास्त्रदान, इत्यादी विविध दानाचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. आपण सर्वजण ,आपापल्या परीने ,प्रत्येक दानामध्ये ,आपला हातभार लावत असतो, आपल्याकडे जे आहे , त्यातलं थोडासा कमी करून, दुसऱ्याला देणे हा त्याग धर्म .पैसाच फक्त दान केला जात नाही,तर एखाद्याची सेवाही दानप्रकारात येऊ शकते. आपल्याकडे असणार्‍या ज्ञानाचेही दान करता येते.
देण्याची सवय मनाला असणे ,गरजेचे.
आपल्याकडे काहीच देण्यासारखे नसले, तरी एक ‘स्मितहास्य’ ‘स्माईल ‘ तर नक्कीच आपण आपल्यासमोर येणार्‍याला देऊ शकतो.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *