पुण्यात्मा जींवधर -11
भाग११
भाग्यश्री मुधोळकर
गंधोत्कटाने आर्यनंदिच्या राहण्याची आणि भोजन वगैरे आवश्यक गरजांची, व्यवस्था केली .आर्यनंदिनी जीवंधराला लिहिणे ,वाचणे ,अंकविद्या शिकवायला सुरुवात केली. त्यानंतर व्याकरण, साहित्य आणि सिद्धांत हे विषयही शिकवले. आर्यनंदी जीवंधराला ,खूप प्रेमाने आणि मन लावून आवडीने शिकवत होते. त्यांची इच्छा होती की जींवधराने लवकरच आपल्या सर्व विद्यांमध्ये पारंगत व्हावं. आर्यनंदी निस्वार्थ गुरु होते. त्यांचे विचार उच्च होते.
इकडे जींवधरही खूप गुणी होता. मन लावून शिकत होता. सोबत गुरुची सेवाही करत होता. त्यांनी दिलेल्या आज्ञेचे पालन तो करत असे. ते जे शिकवायचे ते लगेच त्याला लक्षात यायचे. शंका ,तर्कवितर्क करून अनेक गुढ गोष्टी त्याने गुरूकडून शिकून घेतल्या होत्या.
गुरु जेवढे त्याला शिकवत, तेवढी त्याची प्रतिभा अधिक संपन्न होत होती. यामुळे आर्यनंदीनाही त्यांला शिकवण्यामध्ये ,खूप आनंद मिळत होता.
लौकिक विषयासोबतच ,आर्यनंदिनी ,जीवंधराला आत्म विद्येतही ज्ञान दाले. आत्मा ,कर्मबंधन ,,संसार, जन्म, पुनर्जन्म व कर्म या विषयावर शिकवलले.
हे सर्व शिकल्यानंतर आखाड्यामध्ये मल्लविद्या शिकवली. मल्लविद्या नंतर ,धनुष्यबाण चालवणं, तलवार चालवणे ,भाले चालवणं,व्युह रचना तोडणं ,अनेक प्रकारच्या शस्त्रांचा वापर, शस्त्र विद्या ही शिकवली.
जींवधर क्षत्रिय राजपुत्र होता. त्याचे पिता वीर क्षत्रिय सत्यंधराचे, रक्त त्याच्या शरीरात होते. त्यामुळे थोड्याच काळात, तो शस्त्र विद्येतही निपुण झाला.
एक दिवस आर्यनंदी गुरु, प्रसन्न चित्ताने बसलेले होते. त्यावेळी जीवंधरा ने एकांत पाहून त्यांना विचारले ,
“गुरुदेव !संसारात मनुष्याला महान करणारा ज्ञानगुण आहे. पण त्या ज्ञानावर ,अज्ञानाचा पडदा असतो .त्यामुळे त्याची चमक धूसर असते. गुरूच्या असीम कृपेमुळे , अज्ञानाचा पडदा दूर होतो ,आणि ज्ञान स्वच्छ रत्ना प्रमाणे चमकायला लागतं .ज्ञानाच्या प्रकाशात ,मनुष्यला आपल्या हिताचे, ज्ञान होते. यामुळे तो संसारातल्या ,इतर लोकांचा ही उद्धार करू शकतो. माझा ,त्या ज्ञानाचा विकास ,तुमच्या शिक्षणामुळे माझा झालेला आहे ,आणि मला शास्त्रविद्या आणि शस्त्रविद्या शिकवून ,तुम्ही माझ्यावर परम उपकार केले आहेत. याची परतफेड, मी कधीच करू शकत नाही.
पण हे गुरुवर! तुमचे मागचे जीवन, जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे, परंतु योग्य संधी न मिळाल्यामुळे, मी तुम्हाला ते विचारू शकलो नाही. आज आपण एकटेच आहोत. तुम्हीमला, थोडक्यात तुमचं जीवन चरित्र सांगण्याची कृपा करा .”
आर्यनंदी हळूच हसले आणि म्हणाले,
” मी साधारण मनुष्य आहे. माझ्या जीवन चरित्र काही विशेष नाही, तरीही ज्या घटना घडल्या आहेत, त्या ऐकण्या योग्य आहेत. नीट लक्ष देऊन त्या ऐक.”
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर