पुण्यात्मा जींवधर-9
भाग्यश्री मुधोळकर
भाग९
गंधोत्कट आणि सुनंदा राजपुत्र जींवधराचे पालन-पोषण ,अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रेमाने करत होते. जींवधर. आपल्या वयाच्या मुलांसोबत ,चंद्र सूर्याप्रमाणे वाढत होता. जींवधराची बाललीला, पाहून त्याच्या धर्म मातापित्याला खूप आनंद होत असे.
बोबडे बोल आणि गोड बोलणं ,अडखळत्या पायाने, पडणं चालणं, मग पाळणं,या आपल्या बाललीलांनी ,जींवधराने सुनंदा आणि गंधोत्कटाचं घर हर्षाने ,भरून टाकलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी ,सुनंदा पुन्हा गर्भवती झाली. आपल्या गर्भ काळामध्ये तिने जींवधरासारख्या, सुंदर गुणी पुत्राला दिवस-रात्र पाहिलेलं होतं.
त्यामुळे नऊ महिन्यानंतर ,तिने एका सुंदर मुलाला जन्म दिला. त्या मुलाचं रूप मुख ,नेत्र ,नाक ,इ.सर्व अंग उपांग जीवंधरा प्रमाणेच सुंदर होते.
त्या मुलाचं नाव नंदाढ्य ठेवलं गेलं नंदाढ्याच्या येण्यामुळे, जीवंधराचे नंदाढ्यावर खूप प्रेम होतं. नंदाढ्यही, जींवनधराशी, खूप प्रेमाने वागत होता. दोघेही राम-लक्ष्मण किंवा बलभद्र नारायण, याप्रमाणे एकमेकांमध्ये स्नेह ठेवून होते.
एक दिवस जींवधर आपल्या मित्रांसोबत ,नगराबाहेर काही दूर खेळत होता. त्यावेळी बाहेरगावाहून येणाऱ्या, एका यात्रेकरूने ,त्या खेळणाऱ्या मुलांना विचारलं ,
“इथून नगर किती दूर आहे ?”
जींवधराने मधुर वाणीने उत्तर दिलं,
” तुम्हाला एवढं हे समजत नाही का? लहान मुलं इथे खेळत आहेत, म्हणजे नगर इथून जवळच असणार.” जीवंधराचे उत्तर ऐकुन यात्रेकरूला खूप प्रसन्न वाटलं. त्याच्या मनात विचार आला की ‘ हा मुलगा बुद्धिमान आणि हुशार आहे ‘.
त्याने जीवंधराला म्हटले,
” बाळा मला खूप भूक लागली आहे. जरा तुझ्या घरी घेऊन चल.
जीवंधराच्या मनात दयेचा भाव जागा झाला आणि तो त्या यात्रेकरूला आपल्या घरी घेऊन गेला, आणि आपल्या स्वयंपाक घरात नेऊन, त्या अनोळखी अतिथीला भोजन करण्यासाठी बसवलं. सोबतच स्वतःही भोजन करण्याला बसला.
क्रमशः
©भाग्यश्री मुधोळकर