पुण्यात्मा जींवधर -7
©भाग्यश्री मुधोळकर
भाग ७
राजपुरी मध्ये एक धनवान शेठजी गंधोत्कट राहत होते. त्यांच्या घरी कोणीही संतान नव्हते. एका निमित्तज्ञानीने, त्यांना सांगितलं होतं,
” काही दिवसांनी तुझ्याकडे पुत्र जन्म होणार आहे, पण तो मृत उत्पन्न होईल. जेव्हा तू त्याला स्मशानभूमीमध्ये घेऊन जाशील ,तिथे तुला दुसरा एक भाग्यशाली तेजस्वी पुत्र दिसेल. त्याला घेऊन तो आपल्या घरी ये आणि त्याचं पालन पोषण कर .”
निमित्तज्ञानीची भविष्यवाणी आज सत्य झाली होती. गंधोत्कटकडे पुत्ररत्नाने जन्म घेतला. गंधोत्कटच्या पत्नीला पुत्र जन्माचा हर्ष होता. तिची वांझपणाची शंका दूर झाली होती. परंतु मृत मुलाला बघून ती खूप दुःखी झाली.
नऊ महिने गर्भ आणि प्रसववेदनेच्या शेवटी ,एक नवी वेदना उत्पन्न झाली, पण भाग्यात जे असते ,त्याच्या वरती काहीही इलाज नसतो.
गंधोत्कटला निमित्तज्ञानीचे म्हणणे आठवले आणि तो मृत मुलाला घेऊन, स्मशानभूमीमध्ये गेला. तिथे त्याला विजया राणीचे बाळ दिसलले. ते आपल्या हाताचा अंगठा तोंडात घालून, खिदळत होते, आवाज करत होते. गंधोत्कटला एक महान वैभव मिळालं.
त्याने त्या फुललेल्या फुलाप्रमाणे सुंदर बाळाला, अतुल हर्षाने उचललं. पुत्र उत्पत्ती पेक्षाही अधिक हर्ष, त्याला या राजपुत्राच्या सहजतेने मिळण्यामुळे झाला.त्या बाळाला स्वतःच्या छातीशी कवटाळून, तो आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी निघाला.
विजया राणीने उच्च स्वरांमध्ये आपल्या बाळाला आशीर्वाद दिला ‘जीव’ म्हणजे जगत रहा. गंधोत्कटाने आश्चर्याने आजूबाजूला पाहिले, परंतु कुठून आवाज येत आहे ते त्याला कळलं नाही,
परंतु विजया राणीचं बोलणं ऐकून त्याने आपल्या मुलाचं नाव ‘जींवधर’ ठेवलं . लगेचच त्या बाळाला घेऊन तो आपल्या घरी आला ,आणि कृतक कोपाने आपल्या पत्नीला म्हणाला,
” तू खूप मूर्ख आहेस.काही बघितलं नाही आणि जिवंत असणाऱ्या पुत्राला मेलेलं, समजलंस.याच्या फुललेल्या मुखकमलाकडे तर बघ.”
गंधोत्कटाचे बोलणे ऐकून त्याची पत्नी सुनंदा चकित झाली. तिने झटपट उठून गंधोत्कटाच्या हातातून त्या नवजात बालकाला घेतलं. तो प्रसन्न वदन होता, आणि आपल्या हाताचा अंगठा चोखत होता. अव्यक्त बाल भाषेमध्ये काही गुणगुणत होता.प्रफुल्लित नीलकमलाप्रमाणे ,नेत्रांनी आकाशाकडे पहात होता. त्याला पाहून ती अतिशय हर्षित झाली. त्या सुंदर बाळाला आपलं बाळ समजून, तिने त्याला जवळ घेतलं. त्याचं चुंबन घेऊन ,आपलं दूध त्याला पाजायला सुरुवात केली. गंधोत्कटाच्या घरांमध्ये ,आज काही वेळ आधी पुत्र मृत्यूच्या शुल्कामुळे एक उदासी पसरलेली होती.
परंतु आता ती उदासी कापरा प्रमाणे उडून गेली, आणि घराच्या कणाकणामध्ये हर्षौल्हासाच्या लहरी आल्या. जनक जननी तर आनंदित होतेच, पण त्यांच्यासोबत सर्व परिवार ,परिजन, मित्र ,संबंधी सगळेजण ,या घटनेने हर्षित झाले.
घरात आनंदाचं वातावरण झालं .वाद्य वाजवायला लागले. नाचगाणे होऊ लागले .सगळे जण आनंदाने विभोर झाले. त्या साऱ्यांना माहितीच नव्हतं, की जो उत्सव ते साजरा करत आहे ,तो या नगरीचा राजा सत्यंधराच्या , राजपुत्र यांचा जन्मोत्सव आहे.
हा सारा हर्षौल्हासाचा समाचार, कांष्ठाधराच्या कानावरही पोचला.
त्याने विचार केला हे गंधोत्कट ,हे सारं काही मला राजसिंहासन मिळालं म्हणून करत आहे.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर