भाग १
©भाग्यश्री मुधोळकर
आटपाट नगर अतिशय रम्य टुमदार,निसर्गाने वरदान दिलेलं मोठं गाव. गावाबाहेर छोटीशी टुमदार टेकडी.टेकडीवर मन प्रसन्न करणारी,छत्रीतील महावीरांची मूर्ती.पहाडाच्या पायथ्याशी मंदिर .यात्रेखरुंसाठी धर्मशाळा.त्यागी निवास. परिसर मोठा आणि भव्य.
या नगरीत जिनसागर महाराजांचा चातुर्मास संपन्न झाला होता. दुपारी जिनसागर महाराज मंदिरामध्ये प्रवचन करणार होते. आज पिच्छीपरिवर्तन होऊन, उद्या त्यांचा विहार होणार होता. चातुर्मासाचे चार महिने कसे गेले, ते भक्तजनांना कळलंच नव्हतं. आहार, प्रवचन ,गुरु वैयावृत्ती,छोटी शिबीरे,पूजाअर्चा , यांचा सार्यांनी खूप लाभ घेतला होता. या चातुर्मासात आटपाट नगरातल्या त्या छोट्याशा महावीर मंदिरामध्ये ,जिनसागर महाराजांचा चातुर्मास झाला होता. श्रावकांना , रोजच्या त्यांच्या जीवनामध्ये उपयोगी पडेल ,असं तत्वज्ञान, रोजच्या साध्या सोप्या जीवनातले उदाहरणे, सहज आचरणात आणता येईल, असा उपदेश जिना सागर महाराजांची ती खासियतच होती.
आटपाट नगरातील हे जिनमंदिर, छोटसं होतं परंतु आजुबाजूला प्रशस्त जागा होती .साधारणत चाळीस ते पन्नास यात्रेकरू राहू शकतील ,अशा पद्धतीची बांधलेली धर्मशाळा .छोटीशी बाग आणि प्रशस्त खूप मोठी जागा असं, हे जिन मंदिर आटपाटनगर आणि आजूबाजूच्या सगळ्या शहर आणि गावांसाठी आकर्षणाचं केंद्र होतं.लांबुनही यात्रेकरु दर्शनासाठी येत.
महाराजांची आहारचर्या अगदि साधी होती.श्रावकांना चौका लावणे सोपे वाटायचे.लहान मुले त्यांच्या पाठशाळेत आनंदाने जात.
जिनसागर महाराज ,सगळ्यांच्या श्रद्धास्थानी होते. त्यामुळे त्यांना आहार देण्यासाठी, त्यांची वैयावृती करण्यासाठी, नेहमीच आजूबाजूचे लोकही गर्दी करत होते. 2019 सालातली ती दिवाळी ,महावीर निर्वाण लोकांनी उत्साहाने साजरा केलेलं होतं. आता महाराजांचे पिच्छी परिवर्तन होऊन, पुढे दुसऱ्या नगरच्या दिशेने ते विहार करणार होते.
उड चला पंछी हरिभरी डालसे
रोको रे रोको कोई गुरुको विहारसे
ही भावना सार्यांच्या मनात होती.
सकाळची त्यांची आहारचर्या झाली. दुपारी त्यांचा प्रवचन होऊन दुसऱ्या दिवशी विहार होणार होता .सकाळी अकरा सव्वा अकराची वेळ.जिन सागर महाराजांनी ,जिनदत्त, जे मंदिराचे अध्यक्ष होते ते ,आणि गावातला एक उत्साही तरुण मुलगा वरूण ,जो सर्व कामात पुढे असे या दोघांना काही चर्चेसाठी बोलावलं होतं.
मंदिरातील इतर श्रावकांच्या लक्षात ही गोष्ट आलेली होती. आणि त्यांना आता जिन सागर महाराज ,आपल्या प्रवचनात काहीतरी महत्त्वाची घोषणा करणार, त्याविषयी, ही चर्चा चालू असणार याचा अंदाज आला होता. सारे जण आतुरतेने दुपारच्या सभेची वाट बघत होते.
बंद दरवाजाआड काय झाली चर्चा?
क्रमशः
©भाग्यश्री मुधोळकर