मदर्स डे

अलक

मदर्स डे
१.

“आई लवकर लवकर तयार हो! किती वेळ लावतेस? स्पेशली तुझ्यासाठी मी सगळं अरेंज केलं ना.”
आदित्य सोनालीला तयार होण्यासाठी घाई करत होता. आज मदर्स डे नंतर निमित्त ,त्याने तिच्यासाठी पिझ्झा पार्टीचा प्रोग्राम आखलेला होता.
आजचा दिवस तुला स्वयंपाक करायला सुट्टी. असं म्हणून सकाळी बाहेरूनच व्यवस्थित जेवण ऑर्डर केलेलं होतं. आणि संध्याकाळी पार्टी.
मुलं मोठी झाली आणि कमाईला लागली,की दिवस बदलतात,याचा प्रत्यय सोनालीला आला.
लहानपणी असंच त्याला बागेत न्यायचं असेल ,तर “लवकर लवकर तयार हो “म्हणून सोनाली घाई करत असे. आता तीच घाई तिलि पार्टी ला जाण्यासाठी,आदित्य करत होता. पालकत्वाच्या भूमिका बदलतात काळाप्रमाणे . खरंच की.

२.
“अहो आई याना लवकर .आवरलं की नाही!” सुमती बाईंना कविता घाई करत होती .
फेब्रुवारीमध्ये नवीनच लग्न झाललेलं. सुमतीबाई कविताच्या सासूबाई.
तिच्या लग्नानंतर आलेला हा पहिला मदर्स डे. वयाच्या दहाव्या वर्षी आईचं छत्र हरपलेले. बाबांनी आणि आजीने मोठं केलेली कविता. लग्नानंतर सासूच्या रूपात आपली आई शोधत होती.सुमतीबाईंचींही मुलीची हौस तिच्या रुपात पूर्ण होत होती.
लग्नानंतर आलेल्या पहिल्याच मदर्स डे च्या, आदल्या दिवशीच ,तिने एक छानशी साडी सुमतीबाई साठी गिफ्ट म्हणून आणलेली होती, आणि ती साडी नेसून छान पैकी मजा करियलि, पिक्चरला त्या जाणार होत्या, आणि नंतर बाहेरच खाबुगिरी करून घरी येणार होत्या.ज्याचा त्याचा मदर्स डे.

३.
अक्षयने घरात मस्त सजावट केलेली होती. आज पासून त्याच्याकडे ,त्याच्या मित्राची मंदारची आई राहायला येणार होती.
कोरोनाचा घाला पडला आणि डॉक्टर असणाऱ्या मंदारला, त्याचं बळी ठरावं लागलं .असंख्य पेशंट्सना जीवदान देणारा ,मंदार मात्र कोरोनाचा बळी ठरला. त्यानंतर आधीच पतीचे छत्र हरवलेली मंदारची आई, एकटी पडलेली होती .अक्षय आई-बाबांशी अक्षय बोलला, आणि मंदारच्या आईला कायमस्वरूपी ,आपल्या घरी राहायला बोलवूया, असा विचार मांडला. अर्थातच अक्षयच्या आई-बाबांनी त्याला काहीच हरकत घेतली नाही. आज मदर्स डेच्या, निमित्ताने तो आपल्या दुसऱ्या आईला ,आपल्या घरी आणि शेवट पर्यंत, आपल्या सोबत राहण्यासाठी घेऊन येणार होता.
अर्थातच यात, त्याच्या पत्नीचे अक्षराची ही साथ, त्याला होतीच.या निमित्ताने तिलाही आणखी एक आई मिळणार होती.

४.

रश्मी सकाळपासूनच उदासवाणी बसलेली होती. आज मदर्स डे. पण आपल्याला,” हॅपी मदर्स डे” म्हणणारं कोणीच नाही ,म्हणून उदास झालेली होती.
लग्नाला पंधरा वर्षे उलटून गेली होती, आणि आता मुलंबाळं, होण्याची आस त्यांनी सोडलेली होती.
त्यामुळे आपल्या नंणदि, जावांचीची मुले, तीच आपली , मुलं असं म्हणून ,ती आणि तिचा पती आनंदाने जगत होते. परंतु तरी असा काही विशिष्ट दिवस झाला ,की मना मध्ये, उदासीनता यायची.
सकाळचा चहा घेत,ती याविषयी विचार करत होती. तेवढ्यात तिला , जावे च्या मुलीचा अन्वी चा फोन आला, “हॅपी मदर्स डे काकू !आज मी आईला घेऊन हॉटेलमध्ये, पार्टी करायला जात आहे, तू ही सोबत चल .अकरा वाजेपर्यंत पोच बरं का ,आकाश हॉटेल ला !.”
मुलीसारखा जीव लावलेल्या ,पुतणीचा फोन येताच, रश्मीची, उदासीनता पुढच्या कुठे पळाली.
रश्मी हॉटेलमध्ये पोचली.र तन्वीने रश्मी साठी आणि तिच्या आईसाठी छानसे,’ कानातले इअरिंग्ज’ गिफ्ट आणले होते .
मदर्स डे साजरा झाला होता.

५.

आज आनंदाश्रमात ‘मदर्स डे’ सेलिब्रेशन होते जरी पाश्चात्य कल्पना असली तरी कृतज्ञतेचा तो सोहळा आनंददायक असतो. सातत्याने गृहित धरणार्‍या आईविषयी जाणीवपूर्वक प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.
अनाथाश्रमात वाढलेल्या आणि पुढे जोडीदार रुपात एकमेकांना निवडलेल्या समीर – सारिकाने आनंदाश्रम काढला होता. इथे अनाथ मुले आणि वृध्द दोघांसाठीचा हा आश्रम होता. त्यामुळे इथे मुले आणि त्यांचे आजीआजोबा असे दिवस साजरे व्हायचे.
आजही सर्व मुले आपल्या आजीआजोंबांना त्यांच्या मुलांची उणीव भासु नये,आणि आपल्याला मिळत असणार्‍या मायेची कृतज्ञता म्हणुन हा सोहळा साजरा करत होते.

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *