पुण्यात्मा जींवधर
भाग ५
©भाग्यश्री मुधोळकर
राजा सत्यंधराला ,आता आपल्या सोबत काय घडणार आहे याचा अंदाज आला होता .काष्ठांगार आपला विश्वासघात करणार, हे त्याला जाणवलं होतं.
राणी विजयाही, पडलेल्या स्वप्नांमुळे ,अधेमधे विचलित होत होती .
परंतु आपल्या गर्भावर चांगले संस्कार व्हावे ,म्हणूनही जागृत होती.धर्मआराधना,जपजाप्य करत होती.
एकीकडे हळूहळू विजयात राणीचे दिवस भरत आले. तिच्या अंगावर गर्भाचा तेज दिसायला लागलं.
तिकडे काष्ठांगर ,राजावर आक्रमण करून ,त्याला हरवण्याचा आणि राज्यावर कब्जा करण्याचे स्वप्न बघू लागला .
त्याने राज्यातील सर्व सैन्याला आपल्या बाजूने वळवून घेतलेलं होतं. त्याचा मेहुणा मंथन त्याच्या सोबत होता आणि त्याला मदत करत होता. राजाला बंदी करावे किंवा मारावे, अशा विचारांचा पगडा त्याच्या मनावर पक्का झाला.
नेमकेच विजया राणीची प्रसूती ज्यावेळी जवळ आली, त्याच वेळेला आपण राजावर आक्रमण करावं आणि राजा आणि त्याचा येणारा वारस,या सर्वांना मारून टाकण्याचा विचार काष्ठांगारांने केला, आणि त्यांनी त्या दृष्टीने पाऊल टाकले.
राजा सत्यंधर निमित्त ज्ञानी होता. त्याला हे कळलं. त्याचवेळी त्याने विजया राणीला, मयुर विमानावर बसवले आणि त्या विमानाला किल्ली दिली आणि राणीला सांगितलं ,
” आता माझ्या वर आक्रमण होऊन माझे काही बरेवाईट होण्याची शक्यता आहे, पण तू मात्र सुरक्षित राहिली पाहिजे. हे मयूर विमान जिथे घेऊन जाईल, त्या ठिकाणी तुझी प्रसुती होईल. तू आपल्या पुत्राचे पालनफोषण कर.”
राजाचे बोलणे ऐकुन राणी विजया रडायला लागली .राजाने तिला समजावले,
“देवी तू क्षत्रियकन्या आहेस.एका शूर क्षत्रियाची पत्नी आहेस आणिएका वीराची माता होणार आहेस. तुला शोक करणे शोभत नाही.”
असे म्हणुन मयुरविमानाला हाजाने आकाशात झेप घ्यायला लावली. राजा पराक्रमी तर होताच, त्यामुळे काष्ठांगाराच्या सेनेला , हरवु शकण्याची खात्री त्याला होती. त्याप्रमाणे ज्यावेळी काष्ठांगराने ,मंथन आणि आपल्या सैन्यासहित हल्ला केला ,त्या वेळेला राजा सत्यंधरही, त्याच्या काही प्रामाणिक मंत्री आणि काही प्रामाणिक सैनिकांसह त्यांच्यासोबत युध्द करायला लागला.
शेकडो सैनिकांना त्यांनी धारातीर्थी पाडले, आणि जवळपास आपला विजय निश्चित केला .
अशा प्रकारे ,संत्यधर राजाने, प्रबळ पराक्रमाने काष्ठांगाराने , पाठवलेल्या सर्व सेनेला पराभूत करून,पलायन करायला भाग पाडले आणि त्याच वेळी राजा संत्यधराच्या मनामध्ये ,दयेचा भावही जागृत झाला. तो विचार करायला लागला,
‘ मी हे काय करत आहे? आपल्या एका शरीराला वाचवण्यासाठी, मी शेकडो शरीरांचा वध केला आहे. यामुळे मृत्यू मला सोडणार आहे का? हे तर सारे नोकर होते .काष्ठांगारने ,जशी आज्ञा दिली तसे यांना वागावे लागले. यात त्यांचा काय अपराध आहे? मी विषयभोगामध्ये ,आसक्त होऊन काष्ठांगाराला राज्य सोपवले नसते, तर हे लोक माझ्याशी लढायला का बर आले असते ?विजया राणीच्या सुंदर रूपाने मला पथभ्रष्ट केलं, आणि त्यामुळे मी राज्यभ्रष्ट झालो. या मंत्र्यांनी मला समजावण्याचा, परोपरीने प्रयत्न केला, पण तरीही मी जागृत झालो नाही .माझ्या या चुकीची शिक्षा तर मला मिळायलाच हवी. विजया राणीचं सुंदर रूप, माझ्यासाठी किती भयंकर सिद्ध झालं. जर मला माझ्या अपमानाचा बदला घ्यायचा असेल ,तर मी या सैनिकांवर कशाला हात उचलू ?काष्ठांगाराला मारून टाकलं ,तर काय हरकत आहे? तोही माझं काय करू शकतो? ही सर्व शुभाशुभ कर्माची विचित्र लीला आहे. म्हणून मला जर मृत्यूपासून वाचायचं असेल, तर संयम, शांती, क्षमा असे ,तपाचे शस्त्र घेऊन ,कर्माचा रणभूमी मध्ये स्वतःला धाराशही केलं पाहीजे.माझ्यासाठी आता ही संधी आहे.’
असा विचार करून सत्यंधाराने आपले अस्त्र-शस्त्र पृथ्वीवर फेकून दिले. आपल्या कवच आणि वस्त्र काढून टाकले. संसार ,शरीर तथा विषय कामापासून ,मोह ममता सोडून दिली. विरक्त होऊन युद्ध क्षेत्रात एका स्वच्छ जागी आत्मचिंतन करत तो बसला. आपल्या मनातील विकार भावांना दूर करून, निर्मळ मनाने ,आत्मचिंतन, करायला लागला .निशस्त्र ,शांत ,निर्विकार आत्मज्ञानात लीन, राजा सत्यंधाराला पाहून एका सैनिकाने, तलवारीने , त्याचा शिरच्छेद केला.
त्या सैनिकाने सत्यंधराच्या ,शिराला धडापासून वेगळं केलं. पण सत्यंधहाचे, चित्त जे आत्मज्ञानात लीन होतं, त्याला वेगळं तो करू शकला नाही. सत्यंधराच्या मृत्यूची, बातमी राजपुरी मध्ये ,तात्काळ पसरली.
सर्व जनता आपल्या, प्रिय न्यायनिपुण राजाच्या मृत्यूची, बातमी ऐकून दुःखी झाली. सर्व स्त्री-पुरुषांनी, सत्यंधराची सज्जनता आणि काष्ठांगाराची, दुर्जनता, याची चर्चा केली.
काहींनी या घटनेनंतर संसाराची असारता जाणुन विरक्ती स्विकारली.
इकडे मयुरविमान विजया राणीला घेऊन गेले तरी कुठे?
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर