कन्या
आज सकाळपासून मेघनाची धावपळ चालू होती. आज तिच्या आईचा वाढदिवस होता. मेघनाने तिच्यासाठी सरप्राईज पार्टी प्लॅन केली होती.
मेघना तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी. आपल्याला मुलगा नाही ,याची खंत न बाळगता जे काही देणे शक्य होतं, ते सगळं देऊन, मेघनाच्या आईवडिलांनी तिला मोठं केलं होतं .योग्य शिक्षण देऊन, योग्य जोडीदार पाहून ,तिचं लग्न लावून दिलं होतं.
पण लग्न झालं तरी मेघनाने आपल्या आई वडिलांची जबाबदारी मी घेणार आहे ,हे आधीच आपल्या नवऱ्याला, सासरच्यांना सांगितलं होतं त्यांनाळी ते मान्य होतं. त्यामुळेच तर तिच्या आई-वडिलांचे आणि तिच्या सासू-सासर्यांचे ही ,खूप छान मित्रत्वाचे संबंध होते
तिच्या आईच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या ,सरप्राईज पार्टीसाठी ,तिचे सासू-सासरे ही सामील होते
मेघना तिच्या आईकडे गेली. आई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या ,
“चल तुझ्यासाठी साडी घ्यायला आपण बाहेर जाऊया.”
असं म्हणत आईला तयार करून बाहेर काढले.
आईला घेऊन ती पार्टीच्या ठिकाणी आली. तिथे तिचे बाबा आधीच पोहोचले होते .मामा, मावशी ,आत्या,काका साऱ्यांना तिथे पाहून ,आईला आपल्या मुलीविषयी, कौतुकही वाटलं.
कोण म्हणतं कन्या परक्याचं धन.ही तर दोन्ही कुलांना जोडणारी वेल.
भाग्यश्री मुधोळकर