पुण्यात्मा जीवंधर-8
©भाग्यश्री मुधोळकर
भाग८
गंधोत्कटकाने पुत्राला नेताच, विजया राणीच्या शोकाला सीमा उरली नाही. विजया आपल्या पती आणि पुत्राच्या वियोगिमुळे शोकग्रस्त झाली. करूण हृदय आकांत करत होते.
आपल्या पती आणि पुत्राची आठवण करत,ती विलाप करायला लागली.
” हे पुत्र तू माझ्या जवळून निघून गेलास. आता मी कोणाच्या आशेवरती जिवंत राहू ?ही राजपुरी माझ्यासाठी शोकपुरी झालेली.हाय रे दुदैवा!आता मी कशाच्याआधारावर जगु!”
दाईचा रूप घेऊन आलेल्या ,धारिणी देवीने विजयाला उच्च स्वरात संबोधन केलं,
” हे राणी !तू हे काय करत आहेस? स्मशानभूमीमध्येही, तू जीवन-मरण आणि आपले – परके याचा भेद समजून घेत नाहीस. गंधोत्कटाने ,ज्या पुत्राला आपलं समजलं होतं. तोच दुसऱ्या क्षणी त्याच्या हातातून निघून गेला. आणि ज्याला तू आपलं समजलं होतं, त्या पुत्राला त्याने स्वतःच मानलं. ज्या पुत्राला माता आपलं मानते, त्यातला प्राण निघून जाताच, क्षणभरही , डोळ्यासमोर ठेवत नाही. पिता आपल्या हाताने त्या , प्राणप्रिय पुत्राला इथे जाळून राख करून टाकतो. तू ज्याला आपलं पुत्र समजत आहे ,त्याचं शरीर कर्म उदयाने तुझ्या पोटातून जन्माला आलं. त्या शरीरात कुठून तरी दुसरीकडुन ,आत्मा आला.
आता मला सांग! ज्या शरीराला तू आपलं समजते, ते इथे जळून भस्म होतं. जरा विवेकाने विचार कर .
तुझे माता ,पिता ,पती तुला सोबत ठेवू शकले नाही. मग तू आता , कोणाला तुझ्या सोबत ठेवू इच्छिते ?यासाठी आता या मोह अंधकारातून बाहेर ये. आपल्या आत्म्यामध्ये, ज्ञानाची ज्योती जागव. आता तू तुझ्या घराच्या बंधनातून सुटलेली आहेस. याला आपलं सौभाग्य समज.तू आता , संयमाने आपली आत्मशुद्धी कर. यामुळे जन्म-मरणाचा फेरा निघून जाईल.”
विजया राणीने धैर्याने आणि शांततेने देवीचा बोलणं ऐकलं. तिची अंतर्दृष्टी जागृत झाली. अंधकारातून बाहेर निघून ,तिने देवीला विचारले ,
” हे सखी मला तू अशा जागी घेऊन चल, जिथे संसारातली मोहमाया ,आपली सावली ही पाडणार नाही. मी आता खरोखरच निश्चिंत आहे या नरदेहाची मी आत्मशुद्धी करेन. चल मला लगेचच, शांत स्थळी घेऊन चल.”
देवी प्रसन्न झाली. तिने विजया राणीला दंडकवनाच्या, तपोवनात नेलं. ते स्थान शांत होतं. तिथे खूप सारे तपस्वी शांततेने आणि पवित्र मनाने तपश्चर्या करत होते. देवीने विजया राणीसाठी ,एका घनदाट वृक्षाखाली, नारळाच्या झावळ्यांची, एक झोपडी बनवली. त्या झोपडीमध्ये राहण्या जगण्यासाठी आवश्यक साधनं जमा केली. थोडे दिवस ती विजया राणी सोबत राहिली.
जेव्हा तिने पाहिले, विजया राणीने आपल्या मोहावर विजय मिळवलेला आहे .तिच्या मनातून पती ,पुत्राची आठवण निघून गेली आहे. पुसट झाली आहे. तिला आत्मचिंतन ,आत्मज्ञान अभ्यासात रुची वाटत आहे. ती आत्मशुद्धी च्या कठीण मार्गावर चालत आहे. संसाराची मोहमाया ,आता तिच्या पासून दूर आहे. तिचे चित्त या तपोभूमी मध्ये रमले आहे .तेव्हा आपलं काम संपलं, असं समजून एक दिवस, काहीतरी कारण काढून, ती तिथून निघून गेली .विजया राणी शांततेने, तिथे आपलं नवं, जीवन जगायला लागली.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर