पुण्यात्मा जींवधर -3

पुण्यात्मा जींवधर

भाग ३

©भाग्यश्री मुधोळकर

असेच दिवस वायुवेगाने जात होते. कपटी कांष्ठागार, काय कृती करणार ?याविषयी कोणाला काही अंदाज नव्हता. दुसरीकडे काही दिवसांनंतर ,राणी विजयाच्या उदरामध्ये, राजा सत्यंधराचा उत्तराधिकारर्‍याचे,बीजारोपण झाले. विजया राणी गर्भवती झाली.
गर्भवती झाल्यावर तिने, रात्रीचा तिसऱ्या प्रहरी,तीन स्वप्ने पाहिली. त्या तीन स्वप्नांमध्ये ,पहिल्या स्वप्नात तिने हिरवागार कल्पवृक्ष ,उन्मळून पडलेला पहिला.
दुसऱ्या स्वप्नात त्याच जागी, दुसरा एक सुंदर कल्पवृक्ष उत्पन्न झाला होता.
तिसऱ्या स्वप्नात ,या नव्या कल्पवृक्षा वर आठ माळा लटकताना तिला दिसल्या .सकाळ झाल्यावर दैनिक कामांमधून निश्चिंत होऊन ,ती उत्सुकतेने राजा सत्यंधरा जवळ गेली ,आणि तिने आपल्या पतीला विचारले,
” आर्य पुत्र !रात्री मला जी तीन स्वप्ने दिसली, त्याचं काय फळ प्रगट होईल?” राजास अत्यंत विद्वान होता, त्याने निमित्त ज्ञानाने स्वप्नांचे फळ जाणले. त्याने राणीला मोठ्या प्रेमाने सांगितलं,
” हे प्रिये !तुझ्या पोटी खूप सुंदर ,गुणी ,भाग्यशाली पराक्रमी पुत्र जन्म घेईल,आणि तो आठ कन्यां सोबत विवाह करेल.”
राणीने, पहिल्या दोन स्वप्नांचं फळ विचारलं, परंतु राजाला स्वतःच्या भविष्यिविषयी त्या स्वप्नांने कळले होते. राजास अत्यंत विद्वान होताच, त्यामुळे त्याला पहिल्या स्वप्नाचे फळ ,आपल्याविषयी घडणाऱ्या अशुभाविषयी आहे, हे कळलं होतं .
परंतु त्यांनी राणीला, हे सांगणं योग्य समजलं नाही ,आणि या स्वप्नांचं, ,’काही विशेष फळ नाही. ‘,असं म्हणून टाळले, पण राणी विजयाला राजाच्या मनात काय चालू आहे ? हे अंदाजाने कळलं,तीही विचारशील,ज्ञानी स्त्री होती.
पतीविषयी असणार्‍या निष्ठेमुळे ,ती चिंतित झाली, आणि मूर्च्छा येऊन जमिनीवर पडली. राजा सत्यंधराने, तिच्या चेहऱ्यावर पाण्याचे थेंब शिंपडून ,आणि पंख्याने वारा घालून तिला शुद्धीवर आणले.
त्यानंतर राजा सत्यंधर तिला म्हणाला,
” प्रिये जे घडायचं असेल, ते घडणारच आहे. त्याच्यासाठी आपण कितीही शोक केला ,तरी ते घडणं टळणार नाही, म्हणून शोक करणे व्यर्थ आहे. तसेच जेव्हा तू माझ्यावर प्रेम करते आहेस, तर माझ्या भविष्याविषयी वाईट विचार का करतेस? आता या अशुभाचा विचार करुन दुःख , दूर करता येणार नाही. याला दूर करण्यासाठी, धर्मा आराधना आवश्यक आहे. जीवनाचे फळ मृत्यू आहे.
प्रत्येकाजीवाला, एक दिवस त्याला सामोरं जावंच लागणार. मृत्यू कधी चार दिवस आधी येणार किंवा चार दिवस नंतर येणार ,तरी त्यापासून घाबरायचं कशाला? तू शुरविराची पुत्री आहेस. आणि शुरवीराची पत्नी आहेस,आणि आता शूरवीराची माता होणार आहेस, उदास राहु नकोस.”
काही दिवसांनी राणीच्या शरीरावरती गर्भारपणाची चिन्ह प्रगट व्हायला लागले. गर्भामुळे डोहाळ्यांची इच्छा व्हायला लागेली. राजा सत्यंधर, तिला हव्या त्या वस्तू देत होता. गर्भामुळे विजया राणीचं उदर ,जसजसं उन्नत व्हायला लागलं, तसंतसं राजा सत्यंधराचे मन, आपल्या जवळ येणाऱ्या मरणाच्या आशंकेने ,चिंतातुर व्हायला लागले. आता त्याचा झोपलेला विवेक जागृत झाला, तो विचार करायला लागला ,
‘मंत्र्यांनी मला योग्य वेळी, किती चांगलं समजावलं होतं, आणि माझं भविष्य वाईट असेल याची कल्पना दिली होती, परंतु मी तिथे लक्ष दिलं नाही पण आता पश्चाताप करुन काय होणार? बाण हातातून सुटलेला आहे, आता तो परत येऊ शकत नाही. राज्याधिकार काष्ठांगराच्या हातात गेले आहेत.आता ते पुन्हा मिळतील, ही आशा व्यर्थ आहे, परंतु आता मला माझ्या वंशाचे संरक्षण करण्याचा, उपाय केला पाहिजे.’
राजाने एका शिल्पकाराला बोलवलं, आणि त्याच्या हाताने मोराच्या आकाराचं विमान बनवून घेतलं. या मोराच्या विमानाला किल्ल्या दिल्यावरती हे मयुरविमान आकाशात उडत असे .सत्यंधराने ,आपल्या गर्भवती विजया राणीला त्या मोरावर बसवून, आकाशात विहार करण्याचा सराव करायला सुरुवात केली.

क्रमशः

भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *