पुण्यात्मा जींवधर-17
भाग १७
भाग्यश्री मुधोळकर
जरी अनेक पत्नी असण्याचा तो काळ होता, तरीही, आपल्या पतीवर फक्त आपलाच अधिकार असावा, असे प्रत्येक स्त्रीला वाटत असतं .त्याला श्रीदत्तची पत्नी अपवाद नव्हती. त्यामुळे गंधर्वदत्ताला, श्रीदत्त सोबत बघून तिला शंका येणे, स्वाभाविकच होतं.
त्यामुळे इतर काही विचारण्याआधी ,श्री दत्तच्या पत्नी ने सगळ्यात आधी, गंधर्व दत्ता विषयी, ही मुलगी कोण आहे?, आणि तुमच्या सोबत आता आली आहे, असं विचारलं.
श्री दत्ताने गंभीरतेने उत्तर दिले,
” ही माझा मित्र विद्याधरांचा राजा गरुडवेगाची पुत्री आहे.एका निमित्तज्ञानी , ज्योतिष्याच्या कथनानुसार ,हिचा विवाह राजापुरी मध्ये होणार आहे.”
श्री दत्ताचे बोलणं ऐकून ,त्याची पत्नी निश्चिंत झाली. त्यानंतर परदेशी यात्रेच्या ,अनेक असंख्य गोष्टी, तिने आपल्या पतीला विचारल्या. श्री दत्ताने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व कथा तिला सांगितली.
दुसर्या दिवशी श्री दत्त राजपुरीचा अधिपती, काष्ठांगाराकडे,वृतांत, सांगायला गेले ,तसेच परदेशातून आणलेले काही मौल्यवान रत्न ,त्याने राजाला भेट दिले. गंधर्व दत्ताच्या स्वंयवराविषयी अनुमती, आज्ञा मागितली. काष्ठांगाराने, यासाठी आनंदाने परवानगी दिली. श्री दत्ताने एका सुंदर विशाल स्वयंवर मंडपाची रचना केली.
एक शुभदिन पाहून ,आजूबाजूच्या नगरातून आणि राजापुरी मधून घोषणा केली ,की जी व्यक्ती वीणावादनात, गंधर्वदत्ताला जिंकून घेईल, ती व्यक्ती गंधर्वदत्ताचा स्वामी असेल ,पती असेल.त्याचा विवाह गंधर्वदत्ता सोबत संपन्न केला जाईल.
सुंदर कन्येशी विवाह होण्याच्या आकर्षणामुळे, आजूबाजूच्या राज्यातील राजे ,क्षत्रिय युवक राजपुत्र, स्वयंवरच्या दिवशी स्वयंवर मंडपात जमा झाले. राजपुरीमधील,जनता, त्या सगळ्यांना बघण्यासाठी , आली होती.
जींवधरकुमारही आपल्या मंडळासोबत, नटून थटून आलेला होता .काष्ठांगारही ,स्वतः मंडपातली, कार्यवाही बघण्यासाठी आला होता.
निश्चित केलेल्या वेळी, मंगलवाद्य वाजवून ,स्वयंवराच्या कार्याला सुरुवात झाली. गंधर्वदत्ता तिथे बसली होती.ती अतिशय सुंदरदिसत होती. अनेक वीणावाद्ये, तिने आपल्या समोर ठेवलेलली होतती. तिच्या दासदासी ,तिच्या जवळ बसलेल्या होत्या.
क्रमाक्रमाने त्या वीणा वाजवणाऱ्या, एकेका युवकाला बोलवायला लागल्या . प्रत्येक जण गंधर्वदत्तासमोर येऊन, आपले वीणावादन कौशल्य प्रगट करायला लागले. गंधर्वदत्ता दिसायला जेवढी सुंदर होती ,तेवढीच वीणा वाजवण्या मध्ये ही निपुण होती. तिच्या वीणावादनाच्या वेळी ,जे मधुर ध्वनी निघत होते, ते ऐकून तेथील जनता मंत्रमुग्ध होत होती.
कित्येक युवक तर, तिच्या त्या मंत्रमुग्ध करणाऱ्या वीणावादनामुळे ,तिच्यासमोर ,वादनाची आपली कला दाखवण्यासाठी गेलेच नाहीत. काही जण तिचं मनोहर रूप बघून ,वीणावादन , विसरून जात होते. काही युवकांनी प्रयत्न केला, पण ते वीणावादना मध्ये गंधर्वदत्ताला हरवू शकले नाही .
जेव्हा स्वयंवर मंडपामध्ये गंधर्वदत्ता समोर कोणीच वीणावादन करण्यासाठी येत नव्हतं , सारे जणांनी आपण हरल्यासारखं कबूल करत होतते, त्यावेळेला जींवधर स्मितहास्य करत आपल्या घोषवती वीणेसोबत,गंधर्वतत्तेला सामोरे गेला. गंधर्वदत्ताच्या समोर, जाऊन वीणा वाजवायला बसला.
गंधर्वदत्ता जीवंधराचं, सुंदर, प्रसन्न ,तेजस्वी ,मंदस्मित पाहून मुग्ध झाली. जीवंधराने, गंधर्व दत्ताला तिच्यासमोरची वीणा, वाजवण्यासाठी मागितली.
गंधर्वदत्ताने ,आपल्या समोर ठेवलेल्या वीणांमधून ,एक वीणा, त्याला काढून दिली. गंधर्वदत्ताने ,दिलेल्या वीणेमध्ये जींवधराला काही ना काही कमतरता आढळत होती.
जींवधराच्या वीणावादन कौशल्याची ,कल्पना गंधर्वदत्ताला आली होती.
शेवटी जींवधर म्हणाला,
” माझ्याजवळ, माझी एक,वीणा आहे, त्यांनेच मी, तुझ्यासोबत वीणा वादनाची जुगलबंदी करेन.”
गंधर्वदत्ताने त्यासाठी सहमती दर्शवली.
सुरु झाले जींवधराचे मधुर वीणावादन ,घोषवती वीणेने,आणि मुग्ध झाली,गंधर्वदत्ता.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर