पुण्यात्मा जींवधर -15
भाग१५
भाग्यश्री मुधोळकर
जींवधरचरित्रशी संबंधित आहे , श्रीदत्त शेठजी नावाच्या एका धनिकाची गोष्ट .राजपुरी राज्यांमध्ये श्रीदत्त शेठ राहात होते. त्यांच्या वडिलांनी ,एवढी संपत्ती जमा करून ठेवलेली होती, की श्री दत्त शेठजींना कोणत्याही प्रकारचं काम करण्याची आवश्यकताच नव्हती .
त्याप्रमाणे काहीही काम न करता, त्यांचा जीवनक्रम चालू होता .परंतु एक दिवस त्यांच्या लक्षात आलं की ,आपला जो साचलेला वडिलांनी ठेवलेला खजिना ,आहे, त्यातला बराचसा भाग कमी झालेला आहे .
त्याच वेळी त्यांच्या असं लक्षात आलं की, जे काही वाडवडिलांनी करून ठेवलेले आहे ,त्याच्यावर किती दिवस जगत राहणार? स्वतःही काही तरी करून, कमाई केली पाहिजे. या विचाराने त्यांनी आसपासच्या ,द्वींपावर जाऊन, व्यापार करण्याचं ठरवलं .त्याप्रमाणे राजपुरी राज्यातलं काही सामान त्यांनी विकत घेतलं ,आणि ते दुसऱ्या द्वीपावर , विकण्यासाठी ते जहाजाने निघाले.
दुसर्या द्वीपावर जाऊन ,त्यांनी ते सामान विकलं . तिथून अजून सामान विकत घेऊन ,ते पुन्हा पुढच्या द्वीपा वर गेले. असं करत करत बरेच दिवस गेले . त्यांनी बऱ्यापैकी व्यापारात नफा संपादन केला. त्यानंतर त्यांना राजपुरीला परत जाण्याची इच्छा निर्माण झाली.
आता आपण पुरेसे धन जमवलेलं आहे ,याविषयी त्यावेळेस त्यांच्या मनात समाधान होतं. एका जहाजांमध्ये त्यांनी राजपुरी मध्ये विकता येईल ,असं काही सामान विकत घेतलं आणि सोबत जमवलेला पैसा अडका होताच. आणि ते आपल्या राजपूरी राज्याच्या दिशेने जहाजाने निघाले .
जहाजाने राजपुरीकडे जात असताना ,काही अंतरावर राजपुरी राज्य असताना, समुद्रामध्ये एक वेगवान भीषण वादळ निर्माण झालं आणि ते जहाज फुटलं.
श्रीदत्त शेठजींना ,क्षणभंगुरतेची जाणीव झाली. एवढे सगळे दिवस कष्ट करून ,जमवलेल्या धनाचा,एका क्षणात नाश झाला आणि त्याच बरोबर स्वतःचा जीव कसा वाचवायचा? याचंही याचीही चिंता होतीच.
परंतु त्यांच्या कर्मोदसाने, त्या जहाजाचं एक फळकुट घेऊन, त्यि आधारावर श्रीदत्त शेठजी तरले ,आणि समुद्राच्या प्रवाहानेच ते, एका कोणत्यातरी द्वीपाच्या किनाऱ्यावर जाऊन पोचले.
क्रमशः
भाग्यश्री मुधोळकर