पुण्यात्मा जींवधर -12

पुण्यात्मा जींवधर

भाग १२

भाग्यश्री मुधोळकर

गुरु आर्यनंदी स्वतःचा परिचय सांगायला लागले.
” इथून उत्तर दिशेला विजयार्ध पर्वत आहे. तिथे आकाशगामीनी, बहुरूपा धारिणी ,इत्यादि अनेक विद्याची माहिती असणारे विद्याधर असतात. ते आपल्या विद्येने विमान बनवून आकाशात विहार करू शकतात . अनेक प्रकारचे आश्चर्यजनक कार्यही करू शकतात. मंत्र, यंत्र, तंत्र त्यांना अवगत असतं .ही विद्या सिद्ध केल्यावर ,अडीच द्वीपा मध्ये ते स्वतंत्रता पूर्वक विहार करत असतात. विद्याधराच्या एका प्रदेशाचा शासक,’ लोकपाल’ नावाचा राजा होता. तो न्याय नीतीने राज्य करत प्रजेचा पालन करत होता.
एक दिवस आपल्या राजभवनात बसून, तो आकाशातली शोभा पाहत होता. आकाशात पक्षांना उडताना बघून, त्याला आकाशात उडणारे पक्षी, आणि आजूबाजूला असलेले ढग यामुळे ,अनेक प्रकारचे दृष्य ,आकाशात बनत होतं . ते मिटत होते .पर्वत, नदी ,वृक्ष, हत्ती ,सिंह, मंदिर, उपवन, महाल असे कितीतरी चित्र ढगांमुळे निर्माण होते. त्यांचे चित्र काढण्यासाठी राजाला मोह झाला. तो ही दृश्ये बघत होता. परंतु वाऱ्याच्या झोताने ,ते दृश्य क्षणभरही स्थिर नव्हतं. राजा लोकपालला, ही अस्थिरता बघुन विरक्ती आली. आपला आत्मा ही, असाच नश्वर आहे, याची जाणीव झाली.
त्याचवेळी त्याने निश्चय केला. राजभवन, राज्य, आभूषण सगळं सोडून ,आपल्या मुलाला राज्यकारभार सोपवून, घर गृहस्थाश्रम सोडून, तो आत्म साधनेमध्ये लीन झाला.
धर्म साधना करण्यात ,बरेच दिवस गेले. स्वतःच्या आत्म्याच्या कल्याणासाठी ,तपत्याग आणि संयम ,याची जोड त्याला मिळाली, परंतु कर्माची गती विचित्र असते, हेच खरं .स्वप्नातही कोणाचा वाईट विचार न करणारा, आपल्या आहार-विहारात, कोणाही छोट्या मोठ्या प्राण्याला कष्ट होणार नाहीत, याचा विचार करणाऱ्या लोकपालाला, त्याच्या संचित कर्माचे फळ लागणारच होतं. त्यामुळे लोकपालाला, भास्मक नावाचा रोग झाला.
मुनी आचारसंहितेचे प्रमाणे दिवसातून ,एकदाच आहार करायचा असायचा .बत्तीस घासच भोजन घ्यावं लागायचं. पण भस्मक रोगामुळे सदैव तो भुकेला राहात होता.आणि मूळ उद्देश आत्मसाधनेत मन लागत नव्हते.
त्या वेळेला लोकपालाने लाचार होऊन, मुनीचर्या सोडून द्यावी लागली. पली भूक भागवण्यासाठी, लोकपाल चारही दिशेला फिरायला लागला.
अशाच प्रकारे फिरत-फिरत, लोकपाल राजपुरी मध्ये आला ,आणि तुझ्यासारख्या बालकामुळे ,त्याच्या हातातील एक घास खाऊन,त्याचि भस्मक रोग नष्ट झाला. तो लोकपाल म्हणजे आज तुझा आर्यानंदी गुरु आहे. आणि ज्या मुलांमुळे त्याची भूक नष्ट झाली, तो जीवंधर आहे.”
” हे गुरुदेव! तुम्ही महान आहात. तुमच्या सारखे गुणसंपन्न गुरु मला मिळाले,हे माझं भाग्य आहे .”
असं बोलून जीवंधराने आपल्या गुरूंना वंदन केलं. प्रसन्नतेचा आवेगातच ,आर्यनंदिनी, आणखी, एक गोष्ट जीवंधराला सांगायची ठरवली, जी आजपर्यंत कोणालाच, माहीत नव्हती. आर्यनंदिनी जीवंधराला विचारले ,
“तू कोणाचा पुत्र आहेस! तुझे कोण माता-पिता आहे? ते सांग .”
जींवधराने निरागसपणे सांगितले,
” माझे माता पिता शेठ गंधोत्कट आणि सुनंदा आहेत”
आर्यनंदिनी सांगितलं,
” तू जरी गंधोत्कट आणि सुनंदा यांच्या पालन-पोषणाने, मोठा झाला आहेस, तरी तुझे खरे माता पिता आहे नाहीत”

क्रमशः

©भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *