भावना शब्दरुप होता ठरतील 'प्रेरणा', लावतील जीवनी मांगल्याच्या तोरणा
भाग्यश्री मुधोळकर
मराठी प्रेरणा – वाचनानंद अमर्याद
प्रेरणा मिळते एखाद्या शब्दातून
आणि साकारते ती कृतीतून..!
जीवन असतंच खाचखळग्यांच ,चढउतारांचं. हवा असतो एखादा विसावा अवघडल्या क्षणी. प्रेरणा हवी असते ,'हेही दिवस जातील' सांगणारी. मनातल्या भावनांना दिशा देणारे काही विचार, आश्वासक ठरणारे शब्द माझ्या या लेखनातून सर्वांना अनुभवता यावेत म्हणून हा प्रयत्न. सच्च्या मनाने उमटलेले हे शब्द सार्यांसाठी असतील ' प्रेरणा'दायी. या खात्रीसह वाचत रहा ,"मराठी प्रेरणा"
मातृभाषा ही मराठी सहज सोपी
अमृताते पैजा जिंके असे बोलकी..
प्रशंसक
सौ भाग्यश्री मुधोळकर ही एक उत्साहमुर्ती आहे. तशी ती एक सिद्धहस्त लेखिका आहेच .साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रात-कथा, कविता, स्फुट लेख, ललित लेख वगैरे-तिच्या प्रतिभेने मुक्त संचार केला आहे .तिचा सळसळता, चैतन्यपूर्ण उत्साह तिच्या साहित्यातून प्रत्ययास येतो .वाचकाला खिळवून ठेवण्याचे कौशल्य तिच्या लेखणीत आहे .तिचा व्यासंग, चौफेर द्रुष्टी, सह्रुदयता ,विषयाचे ज्ञान यांचा मिलाप तिच्या साहित्यातून सगळ्यांना दिसेलच. तिच्या या ब्लॉगला शुभेच्छा!!
डॉ हेमलता जोहरापुरकर
लेखिका , अहमदाबादभागयश्री, छान लिहिते आहेस. तुझ्या मनातले विचार मांडता मांडता वाचकाला स्वत:च्या मनात डोकवायला लावते आहेस. बालपणचे स्मरणरंजन, सकारात्मक दृष्टिकोण, सतत स्वत:ला सुधारत राहण्याची वृत्ती, स्मार्ट आणि समजूतदारपणे जगण्याच्या युक्त्या असे वेगवेळले पैलू आहेत तुझ्या या छोट्या लेखांमध्ये. लिहीत रहा.
शुभदा चौकार
मुख्य संपादक - वयम मासिक आणि मुंबई ग्राहक पंचायतीची कार्यकर्तीलेखिका - भाग्यश्री मुधोळकर
मराठी साहित्यात मुंबई विद्यापीठाची एम.ए. पदवीप्राप्त.पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण.
लहानपणापासुन लिखाणवाचनाची आवड.शिक्षण सुरु असतांनाच विविध माध्यमातून लिखाण सुरु केले.दैनिक ‘सागर या वृत्तपत्रातून सदरलेखन करुन लेखनकारकिर्दीला सुरुवात.पुढे स्वतःचा,’ग्राहकहित’ नावाचा दिवाळी अंक १९९१साली संपादित करुन प्रकाशित….