लेखिकेबद्दल

मराठी साहित्यात मुंबई विद्यापीठाची एम.ए. पदवीप्राप्त.पत्रकारितेचा अभ्यासक्रम पूर्ण.
लहानपणापासुन लिखाणवाचनाची आवड.शिक्षण सुरु असतांनाच विविध माध्यमातून लिखाण सुरु केले.दैनिक ‘सागर या वृत्तपत्रातून सदरलेखन करुन लेखनकारकिर्दीला सुरुवात.

पुढे स्वतःचा,’ग्राहकहित’ नावाचा दिवाळी अंक १९९१साली संपादित करुन प्रकाशित.
‘ग्राहक संरक्षण’ हे पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित
‘शालेय खरेदी’ नावाचे पुस्तक.
मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक’ मुखपत्राचे काही काळासाठी संपादन.

‘दिशा जीवनाची’ ह्या मालिकेचे लेखन.
‘ग्राहक हिताय ग्राहक सुखाय’ ह्या महाराष्र्ट शासननिर्मित लघुपटाचे लेखन.
राष्र्टीय ग्राहक युवासुरक्षा पुरस्कार
भारत सरकारतर्फै १९९१ सालातील कार्यासाठी मिळाला.ग्राहक संरक्षणासाठी विविध माध्यमातून लेखन आणि सादरीकरणातून ग्राहक जागृती केल्याबद्दल.
मुंबई ग्राहक पंचायत,व्होल्टाज कंपनी,महाराष्र्ट शासन,,विविध पुरस्कार
महाराष्र्ट शासनाच्या ग्राहक संरक्षण परिषदेवर पाच वर्ष नियुक्ती.

आकाशवाणी , दूरदर्शनवर विविध कार्यक्रमात सहभाग.
विविध वृत्तपत्रांमध्ये लिखाण.
विविध प्रकारच्या मराठी आणि हिंदी शुभेच्छापत्रांचे लेखन.
‘ओमेनकार्डस’ नावाने स्वतःची शुभेच्छाकार्ड कंपनी.
सध्या डिजिटल माध्यमातून माॅमप्रेसो साईटवर,आणि इतर लेखनकार्य सुरु.