महावीर त्यांना कळले हो -२

भाग२

खरंतर चार महिने कसे निघून गेले ते कोणत्याही श्रावकाला कळलं नव्हतं. गुरु सानिध्य असतंच असं भारावून टाकणारं.परंतु शेवटी पुढच्या गावातल्या, आणि जनकल्याणासाठी जैन पंररेप्रमाणे, गुरूंचा विहार तर होणारच होता.
ठरल्याप्रमाणे दुपारी सभा सुरू झाली. महाराजांनी ओघवत्या वाणीत प्रवचन सुरु केलं .बंद दाराआड जिनदत्त ,वरुण आणि महाराज यांच्यात काय चर्चा झाली? याचा कोणाला काहीच अंदाज नव्हता.
महाराज बोलत होते,
माझा चातुर्मास संपन्न झाला. आता मी पुढील वाटचालीसाठी विहार करत आहे, परंतु तुम्हा सर्वांचा आग्रह आणि इच्छा त्याच्यामुळे ,मी आश्वासन देतो की आजपासून नंतर दीड वर्षांनी ,2021 सालची, जी, ‘महावीर जयंती’ असेल, तेव्हा मी पुन्हा इथे विहार करत करत येईन,त्यासाठी मी इथे एक निमित्त निर्माण करत आहे. आपल्या ह्या मंदिराचा परिसर मोठा आहे. मंदीराच्या परिसराला लागून जी चार एकर जागा आहे, ती आजच्या प्रसंगी जिनदत्त शेठजी ,या मंदिराला अर्पण करत आहेत. त्या जागेवर ती विशाल धर्मशाळा ,विशाल मूर्ती निर्माण होईल. या सर्व गोष्टींसाठी, मी तुम्हा सर्वांना सढळ हाताने दान देण्याचा उपदेश देत आहे. वाईट हे मदिर आणि मोठी धर्मशाळा सगळ्या लोकांसाठी प्रेरक ठरेल, याविषयी मला खात्री आहे. तिथे जमलंच तर एखादा लग्न हॉल आणि तेथे धर्मशाळेत लोकांची सोय होईल.धार्मिक मोठे कार्यक्रम तिथू घेण्यित येतील. असं झालं तर मंदिराला नियमित उत्पन्न मिळत राहील.देखरेख चांगली राहिलू.अनेक हातांना किम मिळेल. आपण सगळ्यांनी भरभरून दानाची आज घोषणा करावी, म्हणजे कामाला लवकर सुरुवात होईल . 2021 च्या महावीर जयंतीच्या दिवशी, काहीतरी भव्यदिव्य आपल्या सर्वांना अनुभवायला मिळेल. आटपाट नगराचे खूप मोठं नाव होईल.”
प्रवचन संपले.
गुरु आज्ञा ,प्रेरणा मानुन,तसेच यांनी स्वतःच्या मालकीची जागा ,मंदिराच्या ट्रस्टला देऊन जिनदत्तांनी मोठा वाटा उचलला होता.
गावातले नावं ठेवणारे ,व्यक्ती होतेच.व्यक्ति तेवढ्या प्रकृती ना.’ एवढ्या मोठ्या मंदिर निर्माणाची, मूर्तींची काय गरज?आहे तेच सांभाळल्या जात नाही.’असं म्हणणारे होते. ‘धर्मशाळांचे काय करता?त्याच्यापेक्षा आहे तेच जपावं, ते बरं नाही का !”असे सारे मतमतांतरे चालू होते.पण दान देणारेही होते. प्रभू सेवेच्या दृष्टीने अग्रेसर होते.
गावामधले आर्किटेक ,तरुण मुलं ,कॉन्ट्रॅक्टर सारे जण कामाला लागले. एक ते सव्वा वर्षांमध्ये सारा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचं त्यांचं स्वप्न होतं,आणि त्यादृष्टीने प्रयत्न तर लगेच सुरू करणं गरजेचं होतं. जागा पैसा सारेकाही जमलेलं होतं.
कामाला जोरात सुरूवात झाली.पायाभरणी झाली. नोव्हेंबर महिन्यापासून कामाला सुरुवात झाल्यावर, आजूबाजूच्या गावातून येणारी यात्रेकरू ,प्रवासी आणि गावातले लोक, जमेल तसे दानामध्ये भर घालतच होते. भव्यदिव्य मंदिर आणि सगळ्यांना आकर्षण ठरेल, अशा पद्धतीचा लग्न हॉल आणि मंदिराला त्यातून उत्पन्न मिळून, सर्व देखरेख असं होणार होतं.
त्यामुळे त्यामुळे सर्व जण उत्साही होते. एकदा गावातल्या लोकांनी मनात आणलं ,भगवंताचा,गुरुचा आशीर्वाद असला, गुरुची मंगल भावना सोबत असली, की ते काम लवकर पूर्ण होणारच .सर्व काही नीट सुरू होतं. बांधकामावर वरुण,जिनदत्त आणि काही विश्वासु लोक लक्ष ठेवून होते. गावातले लोक,या सर्वांवर लक्ष ठेवून होते. लक्ष ठेवून होते हळूहळू लोकांच्या लक्षात आलं, की हे मंदिर नार्माण होत नाही आहे.धर्मशाळा चांगली आकार घेत होती.पण मंदिराऐवजि वेगळीच इमारत आकार घेत आहे.
त्याच वेळेला गावातल्या लोकांच्या हेही लक्षात आलं होतं, की गावाबाहेर ,जिनदत्तांच्या सहा एकर पडिक जागेतही काहीतरी बांधकाम सुरु आहे. तिथेही काहीतरी मोठा कारखाना उभा रहात आहे. हे नक्की काय आहे?ह्याची उत्सुकता तर होती.पण लोकांना फार चौकश्या करायला संधीच मिळाली नाही.
मार्च२०२० महिन्याच्या शेवटी कोरोनाने भारतात पाय पसारायला सुरुवात केली. मंदिरेच बंद झाली. पण थोडी सूट मिळताच,काम सुरु झाले.
काय चालु आहे,हे लोकांना कळतचं नव्हंत.

क्रमशः

©भाग्यश्री मुधोळकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *